‘त्या’ केस कर्तनकाराकडून रोहित पवारांनी हेअरकट केला!

| Updated on: Jan 22, 2020 | 10:11 AM

रोहित पवार अहमदनगरमधील कर्जतच्या 'ओम नागेश्वर मेन्स पार्लर'मध्ये हेअरकट करण्यासाठी गेले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली.

त्या केस कर्तनकाराकडून रोहित पवारांनी हेअरकट केला!
Follow us on

अहमदनगर : आपला लाडका नेता जिथे-जिथे जाईल, तिथे कार्यकर्ते गर्दी करत असतात. राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांची क्रेझ कार्यकर्त्यांपासून मतदारांपर्यंत सर्वांमध्ये दिसते. कर्जतमध्ये रोहित पवार हेअरकट करण्यासाठी गेले असता, तिथेही कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. मतदारसंघातील चांगला कारागीर म्हणून याच ठिकाणी आपण केस कापायला आल्याचं रोहित पवारांनी (Rohit Pawar Haircut) सांगितलं.

रोहित पवार अहमदनगरमधील कर्जतच्या ‘ओम नागेश्वर मेन्स पार्लर’मध्ये हेअरकट करण्यासाठी गेले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली.

निवडणुकीच्या धावपळीतही याच सलूनमध्ये रोहित पवार यांनी केस कापले होते, त्यावेळचा किस्साही रोहित पवार यांनी आवर्जून सांगितला. ‘त्यावेळी इथल्या सगळ्या कारागिरांनी मला आमदार होण्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या होत्या. अखेर त्या शुभेच्छा कामी आल्या आणि लोकांनी मला भरघोस मतांनी आमदार म्हणून निवडून दिलं.’ अशी आठवण रोहित पवारांनी सांगितली.

व्यस्त दिनक्रमामुळे अनेकदा केस कापायलाही वेळ मिळत नाही. मग मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी मोठ्या सलूनमध्ये जाण्याऐवजी मतदारसंघात एक चांगला कारागीर असलेल्या ठिकाणी केस कापायला काय हरकत आहे, असा विचार मी करत असतो. त्यानुसारच ‘ओम नागेश्वर मेन्स पार्लर’मध्ये जाऊन केस कापल्याचं रोहित पवारांनी सांगितलं.

यावेळी शाल आणि श्रीफळ देऊन इथल्या कारागिरांनी रोहित पवार यांचा सत्कार केला. त्यांच्या या प्रेमाच्या सत्काराने मी खूप भारावून गेलो, असं रोहित पवार (Rohit Pawar Haircut ) म्हणाले.

म्हणून कर्जत जामखेड…

हडपसरचे जावई असूनही तो मतदारसंघ न निवडता कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न रोहित पवारांना अवधूत गुप्ते यांनी विचारला होता. तेव्हा, ज्यांचं लग्न झालं आहे, त्यांना कळेल सासुरवाडीचं गणित जमवणं किती अवघड असतं.’ असं रोहित पवार म्हणताच एकच हशा पिकला होता.

महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संगमनेरमध्ये संवाद साधण्यात आला होता. ‘अमृतवाहिनी महाविद्यालया’तील युवा सांस्कृतिक महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ कार्यक्रमाअंतर्गत रोहित पवार बोलत होते.

अनेक जणांना वाटायचं, की पवारसाहेब रिटायर होतील, मात्र कोणत्याही संकटापुढे झुकायचं नाही, हे शरद पवार यांच्याकडून शिकल्याचंही नातू रोहित पवार यांनी सांगितलं होतं.