सोलापुरात गारपीटीसह जोरदार पाऊस, द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान

| Updated on: Apr 18, 2020 | 5:20 PM

राज्यावर आधीच कोरोनाचं संकट आहे. त्यातच भर उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवलं आहे.

सोलापुरात गारपीटीसह जोरदार पाऊस, द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान
Follow us on

सोलापूर : सोलापूर शहरासह अनेक ग्रामीण भागांमध्ये आज अवकाळी (Rain In Solapur) पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी वादळी वारा आणि गारांसह पाऊस झाला. राज्यावर आधीच कोरोनाचं संकट ( Corona Virus) आहे. त्यातच भर उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट (Rain In Solapur) ओढवलं आहे.

सोलापूर शहरात एकीकडे कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर, दुसरीकडे सोलापुरात झालेल्या गारपीटीसह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आधीच कोरोनामुळे सोलापुरातील शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यातच अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट ओढवले आहे (Rain In Solapur).

पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांनी जनावरांसाठी ठेवलेल्या कडब्याचंही पावसात नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने काही ठिकाणी ग्रामीण भागातल्या लोकांच्या घरावरची पत्रे उडून गेली आहेत, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ झाली होती. त्यामुळे उकाड्याने नागरिकांचे हाल होत होते. मात्र, आज झालेल्या पावसामुळे सोलापूरकरांना (Rain In Solapur) थोडासा दिलासा मिळाला आहे.

सोलापुरात कोरोनाचे 12 रुग्ण 

सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातलं आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. सध्या राज्यात 3320 कोरोना रुग्ण आहेत. तर सोलापुरात सध्या 12 कोरोनाबाधित आहेत. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

12 लाख बांधकाम मजुरांच्या खात्यावर प्रत्येकी 2 हजार जमा होणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

कराडमधील पहिला रुग्ण कोरोनामुक्त, रुग्णालयातून टाळ्यांच्या गजरात निरोप

जिल्हाबंदी मोडून पुण्यापर्यंत जाऊन दाखव, हुल्लडबाजांची पैज, सोलापुरातील दोघांवर गुन्हा

45 खोल्यांचे अलिशान हॉटेल कोरोनाशी लढा देणाऱ्यांना खुलं, सोलापूरच्या शिवसेना नगरसेवकाची दानत