विना निमंत्रणाचं कोणत्याही लग्नात घुसू नका, विद्यार्थ्यांना नोटीस

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

कुरुक्षेत्र : हरियाणाच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (NIT) विद्यार्थांसाठी एक आदेश जारी केला आहे. याअंतर्गत आता एनआयटीच्या विद्यार्थांना आमंत्रण नसलेल्या लग्नात जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. यासंबंधी एनआयटी वसतीगृहाचे प्रमुख वॉर्डन यांच्या नावाने एक परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या परिपत्रकानुसार, जर एनआयटीचा कुठलाही विद्यार्थी आमंत्रण नसलेल्या लग्नात किंवा पार्टीत गेला तर त्याच्यावर कठोर […]

विना निमंत्रणाचं कोणत्याही लग्नात घुसू नका, विद्यार्थ्यांना नोटीस
Follow us on

कुरुक्षेत्र : हरियाणाच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (NIT) विद्यार्थांसाठी एक आदेश जारी केला आहे. याअंतर्गत आता एनआयटीच्या विद्यार्थांना आमंत्रण नसलेल्या लग्नात जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. यासंबंधी एनआयटी वसतीगृहाचे प्रमुख वॉर्डन यांच्या नावाने एक परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या परिपत्रकानुसार, जर एनआयटीचा कुठलाही विद्यार्थी आमंत्रण नसलेल्या लग्नात किंवा पार्टीत गेला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

 

एनआयटी मुलांच्या वसतीगृहाचे प्रमुख वॉर्डन यांच्या नावाने जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकानुसार, “अनेक विद्यार्थी हे आमंत्रण नसलेल्या लग्नात किंवा कार्यक्रमात जात असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. या प्रकारची वागणूक पूर्णपणे चुकीची आहे. सर्व विद्यार्थांना सूचित केलं जातं की, अशा प्रकारच्या उपक्रमांपासून दूर राहा. जर कुठला विद्यार्थी संस्थेच्या नियमांचं उल्लंघन करताना आढळला, तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.”

हे परिपत्रक 16 मार्चला जारी करण्यात आलं आहे. हे परिपत्रक एनआयटी कॅम्पसच्या बहुतेक नोटीस बोर्डवर लावण्यात आले आहे.