भाजप खासदाराच्या खात्यातून 15 लाख गायब

| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

बंगळुरु : कर्नाटकच्या भाजप खासदार शोभा करंदलाजे यांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. शोभा करंदलाजे यांच्या सॅलरी अकाऊंटमधून जवळपास 16 लाख रुपये लंपास करण्यात आले आहेत. या प्रकरणी त्यांनी दिल्लीच्या नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. करंदलाजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या गेल्या आठवड्यात बँकेत पासबुक अपडेट करायल्या गेल्या होत्या, तेव्हा त्यांना त्यांच्या […]

भाजप खासदाराच्या खात्यातून 15 लाख गायब
Follow us on

बंगळुरु : कर्नाटकच्या भाजप खासदार शोभा करंदलाजे यांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. शोभा करंदलाजे यांच्या सॅलरी अकाऊंटमधून जवळपास 16 लाख रुपये लंपास करण्यात आले आहेत. या प्रकरणी त्यांनी दिल्लीच्या नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. करंदलाजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या गेल्या आठवड्यात बँकेत पासबुक अपडेट करायल्या गेल्या होत्या, तेव्हा त्यांना त्यांच्या खात्यातून 15 लाख 62 हजार रुपये गहाळ झाल्याचं कळालं.

वृत्तानुसार, करंदलाजे यांच्या खात्याला हॅक करुन डिसेंबर 2018 मध्ये अनेकदा त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मेसेज अलर्ट अॅक्टीव्ह असूनही त्यांना एकदाही पैसे काढल्याचा मेसेज आला नाही.

“जर माझ्यासोबत ही फसवणूक होऊ शकते तर सामान्य जनतेचं काय होईल? जेव्हा कुठला व्यवहार होतो, तेव्हा एसएमएस अलर्ट येतो. मात्र इतके पैसे काढण्यात आले आणि एकही मेसेज आला नाही. हे अत्यंत आश्चर्यकारक आहे”, असे करंदलाजे यांनी सांगितले.

नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली असून सध्या हे प्रकरण सायबर सेलकडे सोपवण्यात आलं आहे.  तसेच पोलीस बँक अधिकाऱ्यांच्याही संपर्कात असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

शोभा करंदलाजे या कर्नाटकच्या उडुपी चिकमंगळूरु येथील लोकसभा खासदार आहेत. त्या कर्नाटक भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.

VIDEO :