पुण्यातील एमआयटी शाळेचे SSC बोर्डातून CBSC बोर्डातील रुपांतरला पालकांचा विरोध

| Updated on: Jul 08, 2019 | 10:05 AM

पुण्यातील कोथरुड परिसरातील एमआयटी विश्वशांती गुरुकुल या इंटरनॅशनल स्कूलने राज्य मंडळाचा अभ्यासक्रमात बदल करून 'सीबीएसई'चा अभ्यासक्रम सुरू करण्याचा घाट घातला आहे.

पुण्यातील एमआयटी शाळेचे SSC बोर्डातून CBSC बोर्डातील रुपांतरला पालकांचा विरोध
Follow us on

पुणे : पुण्यातील कोथरुड परिसरातील एमआयटी विश्वशांती गुरुकुल या इंटरनॅशनल स्कूलने राज्य मंडळाचा अभ्यासक्रमात बदल करून ‘सीबीएसई’चा अभ्यासक्रम सुरू करण्याचा घाट घातला आहे. मात्र शाळेतील विद्यार्थी आणि पालकांना याबाबत काहीच कल्पना नसल्याने पालकांनी शाळेबाहेरच आंदोलन सुरु केले आहे. तसेच अनेक पालकांनी राज्य मंडळाचा अभ्यासक्रम सुरु ठेवण्याचा आग्रह धरला आहे.

एमआयटी विश्वशांती गुरुकुल ही पुण्यातील कोथरुड भागातील नामांकित इंटरनॅशनल शाळा आहे. या शाळेत पुण्यातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असतात. मात्र या शाळेने विद्यार्थी आणि पालकांना विश्वासात न घेता काही दिवसांपूर्वी राज्य मंडळाच्या एसएससी बोर्डाचा अभ्याक्रम बदलून सीबीएसईचा अभ्यासक्रम चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळेच्या या निर्णयाला पालकांनी विरोध केला आहे. त्याशिवाय संतप्त पालकांनी  शाळेबाहेरच जोरदार आंदोलन सुरु केलं आहे. दरम्यान बोर्डात बदल करण्यासाठी शाळेत आजपासून दोन दिवसीय तपासणी केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (8 जुलै) अनेक पालकांनी आंदोलन केले आहे.

दरम्यान गेल्यावर्षी या शाळेने विद्यार्थ्यांनी कुठल्या रंगाची अंर्तवस्त्र घालावीत याबाबत पत्रक काढले होते. या पत्रकामुळे पालक चांगलेच संतप्त झाले होते. त्यानंतर अखेर या शाळेने काढलेले परिपत्रक रद्द केलं होतं. यानतंर आता राज्य मंडळाचा अभ्यासक्रम बंद करून ‘सीबीएसई’चा अभ्यासक्रम सुरु करण्याचा घाट घातल्याने ही शाळा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.