शेगावच्या टेलरकडून नरेंद्र मोदींना मास्क भेट, पंतप्रधान कार्यालयातून आभारपत्र

| Updated on: Sep 27, 2020 | 6:18 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेगाव शहरातील स्वामी टेलर्स या दुकानाचे मालक कृष्णा पाटील यांनी पाठवलेला मास्क स्वीकारला आहे. याबाबतचे पीएमओ कार्यालयाचे पत्र मिळाल्याने पाटील यांना आनंद झाला आहे. (Narendra Modi accepted mask made by Krishna Patil)

शेगावच्या टेलरकडून नरेंद्र मोदींना मास्क भेट, पंतप्रधान कार्यालयातून आभारपत्र
Follow us on

बुलडाणा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेगाव शहरातील स्वामी टेलर्स या दुकानाचे मालक कृष्णा पाटील यांनी पाठवलेला मास्क स्वीकारला आहे. पंतप्रधानांनी  मास्क स्वीकारल्याचे पत्र पाटील यांना मिळाले आहे. हे पत्र पंतप्रधान कार्यालयाने पाठवलेय. कृष्णा पाटील यांनी स्वत: शिवलेला मास्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयाच्या पत्यावर पाठवला होता. (Narendra Modi accepted mask made by Krishna Patil )

शेगाव शहरातील जेन्टस स्पेशालिस्ट टेलर कृष्णा पाटील हे नरेंद्र मोदी यांचे चाहते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती कपड्यांचा मास्क वापरण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पाटील यांनी ना नफा ना तोटा तत्वावर मास्क निर्मिती आणि विक्री सुरु केली.

दरम्यान, कृष्णा पाटील यांनी नरेंद्र मोदी यांच्याकरीता त्यांच्या पध्दतीने एक खास मास्क शिवण्याची संकल्पना सूचली. त्यानंतर पाटील यांनी मोदींसाठी खास मास्क शिवला आणि नवी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयाच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवला.. त्यानंतर १५‌ दिवसांनी पंतप्रधान कार्यालयातून पाठवण्यात आलेले पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.

नरेंद्र मोदी यांनी मास्क स्वीकारल्याचे पत्रात नमूद करण्यात आलेय. पंतप्रधान मोदींनी मास्क स्वीकारल्याचे पत्र वाचून कृष्णा पाटील यांना आनंद झाला आहे.

संबंधित बातम्या:

पंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा

मोदी सरकारला मोठा धक्का, अकाली दलाची एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा

(Narendra Modi accepted mask made by Krishna Patil )