पंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करणार आहेत.(PM Narendra Modi Mann ki Baat Live Update)

पंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा
Follow us
| Updated on: Sep 27, 2020 | 9:22 AM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  आज (27 सप्टेंबर) मन की बात (Mann ki Baat) या कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करणार आहेत. मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविषयी बोलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशभरातील शेतकरी कृषी विधेयकाचा विरोध करत आहेत. त्यामुळे मोदी कृषी विधेयकावरुन देशवासियांना संबोधन करु शकतात. (PM Narendra Modi Mann ki Baat Live Update)

आज सप्टेंबर महिन्यातील शेवटचा रविवार आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदींचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम प्रसारित होतो. आज प्रसारित होणार कार्यक्रम हा 69 वा असणार आहे. पंतप्रधान मोदींनी शनिवारी त्यांच्या ट्विटरवरुन ट्विट करत नागरिकांना आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्याचं आवाहन केलं आहे.

कोरोना काळात मोदींनी सतत जनतेशी संवाद साधला आहे. आज ते नेमकं कोणत्या विषयावर बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजच्या या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी विधेयक, शेती आणि शेतकरी या विषयांवर बोलण्याची शक्यता आहे. यासोबतच कोरोना महामारी आणि भारत-चीन सीमावादावरही मोदी भाष्य करण्याची शक्यता आहे.

गेल्या मन की बात या कार्यक्रमातून आत्मनिर्भर भारत यावर चर्चा केली होती. आता सर्वांना लोकल टू व्होकल व्हावं लागणार आहे. भारतीय बाजारपेठा या चीनी खेळण्याच्या वस्तूंनी व्यापल्या आहेत. त्यामुळे देशवासियांना मिळून काही नवीन खेळाचे प्रकार बनवले पाहिजेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते.

कृषी विधेयकाला विरोध का?

कृषी विधेयक शेतकरी विरोधी असल्याचं सांगून रद्द करण्याची मागणी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांची आहे. दुसरीकडे भाजपने कृषी विधेयकं शेतकऱ्यांच्याच बाजूनं असल्याचा दावा केलाय. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना देशात कोणत्याही राज्यात शेतमाल विकता येणार आहे. बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या चक्रातून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. शेतकऱ्यांना खरेदीदारासोबत 5 वर्षांसाठी शेतमालाचा करार करता येणार आहे. शेतकरी बंधनमुक्त होईल आणि कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढेल. पण यामुळे शेतीमालाला MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत मिळणार नसल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला आहे. (PM Narendra Modi Mann ki Baat Live Update)

संबंधित बातम्या : 

कृषी विधेयकाविरोधात ‘भारत बंद’, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषी विधेयकाच्या जीआरची होळी

कृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.