AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6 महिन्यांत अंकिता लोखंडेच्या पतीवर दुसऱ्यांदा सर्जरी; नेमकं काय झालं?

अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती आणि बिझनेसमन विकी जैनवर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली. सहा महिन्यांपूर्वीच विकीवर एक सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याची प्रकृती कशी आहे, याचे अपडेट्स समोर आले आहेत.

6 महिन्यांत अंकिता लोखंडेच्या पतीवर दुसऱ्यांदा सर्जरी; नेमकं काय झालं?
अंकिता लोखंडे, विकी जैनImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 08, 2026 | 8:44 AM
Share

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अभिनेत्री अंकिता लोखंडे घराघरात पोहोचली. अंकिताने बिझनेसमन विकी जैनशी लग्न केलं. ही जोडी सतत काही ना काही कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या विकी त्याच्या प्रकृतीच्या कारणास्तव चर्चेत आला आहे. गेल्या सहा महिन्यांत त्याच्यावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता त्याने चाहत्यांना त्याच्या प्रकृतीविषयीचे अपडेट्स दिले आहेत. सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये त्याच्या हाताला बँडेज लावलेलं दिसत आहे. या पोस्टमध्ये विकीने सांगितलं की त्याची सर्जरी पूर्ण झाली आहे आणि सध्या तो लवकरात लवकर बरं होण्याकडे लक्ष केंद्रीत करत आहे. विकीने लिहिलं, ‘सर्जरी झाली आहे. आता ठीक होण्याची वेळ आहे आणि हेसुद्धा दाखवण्याची वेळ आली आहे की मी सतत अपघातांचा शिकार होणारा नाही.’

विकीने तो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये त्याच्या हातावर पट्टी बांधलेली दिसत आहे. या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये रुग्णालयातली रुम पहायला मिळतेय. काही महिन्यांपूर्वीच विकीच्या हाताला मोठी दुखापत झाली होती आणि शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या हातावर तब्बल 45 टाके पडले होते. विकीच्या हातात काचेचे अनेक तुकडे रुतले गेले होते, त्यामुळे 45 टाके पडले होते. जवळपास आठवडाभर तो रुग्णालयातच होता. त्यावेळी पत्नी अंकिताने त्याची पूर्ण काळजी घेतली होती. आता विकीच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी त्याच्या आरोग्याविषयी काळजी व्यक्त केली आहे.

दरवर्षी विकी आणि अंकिता रंगपंचमीनिमित्त जंगी पार्टीचं आयोजन करतात आणि त्यात टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना आमंत्रित केलं जातं. अंकिता आणि विकीची होळीची पार्टी सोशल मीडियावर खूप चर्चेत असायची. परंतु यंदा विकीच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी होळीच्या पार्टीचं आयोजन केलं नव्हतं.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतशी ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताने 2019 मध्ये विकी जैनला डेट करण्यास सुरुवात केली. विकी हा मूळचा बिलासपूरचा असून तो मोठा व्यावसायिक आहे. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2021 मध्ये या दोघांनी धूमधडाक्यात लग्न केलं. अंकिता आणि विकीने ‘स्मार्ट जोडी’ आणि ‘बिग बॉस 17’ यांसारख्या शोजमध्ये भाग घेतला होता.

Follow Us
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? NCP नेत्याचा...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? बड्या NCP नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा