हाथरवसरुन राजकारण करणारे पुण्याच्या शिरुर प्रकरणात झोपले काय?, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

| Updated on: Nov 06, 2020 | 6:40 PM

हाथरवरुन राजकारण करणारे पुण्याच्या शिरुर प्रकरणात झोपले काय?, असा हल्लाबोल विरोधी परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.

हाथरवसरुन राजकारण करणारे पुण्याच्या शिरुर प्रकरणात झोपले काय?, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
Follow us on

पुणे : “त्यादिवशी नेमके काय घडले ते मी सर्व सांगेन… आरोपींना मी ओळखते.. त्या नराधमांनी माझ्यावर काय-काय अत्याचार केले हे पण सांगेन… पण मला माझे दोन्ही डोळे परत द्या… अशी आर्त विनवणी शिरुर घटनेतील पीडित महिलने आज केली. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज (शुक्रवारी) पुण्यात ससून रुग्णालयात जाऊन पीडित महिलेची भेट घेतली. यानंतर पीडितेने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.  (Pravin Darekar Meet Shirur Victim)

शिरुर तालुक्यातील न्हावरे गावातील एका महिलेवर क्रूर हल्ला करुन तिचे डोळे काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला.  याप्रकरणातील नराधमांना तात्काळ अटक करण्याची आग्रही मागणी प्रवीण दरेकर यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे केली.

न्हावऱ्यातील घटना अतिशय गंभीर आणि भयंकर आहे. पुण्यात गेल्या काही महिन्यांमध्ये महिला अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे पुण्याच्या प्रशासनाने अशा घटनांची तातडीने दखल घेण्याची गरज आहे. हाथरसच्या घटनेचा बोलकाना देशभर आरडाओरड करणारे आता कुठे झोपले आहेत, असा सवाल यावेळी प्रवीण दरेकर यांनी विचारला.

हाथरससारख्या घटना रोज मुंबई आणि महाराष्ट्रात घडत आहेत, परंतु हाथरसच्या घटनेचे राजकारण झाले. पण आता या शिरुरच्या घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि हा प्रश्न सरकारने सोडवला पाहिजे. नाही तर रोज शिरुरसारख्या घटनेप्रमाणे महिलांना अत्याचारांच्या प्रसंगांना सोमोरे जावे लागेल, अशी चिंताही दरेकर यांनी व्यक्त केली. प्रवीण दरेकर यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांची या प्रकरणासंदर्भात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

शिरुरच्या निर्दयी घटनेतील नराधमांना तात्काळ अटक करा. पुण्यामध्ये महिला अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुण्यासारख्या सांस्कृतिक वैभव असणा-या शहराला असे प्रकार शोभणारे नाही. पोलिसांचा धाक दरारा संपला आहे. सरकार पण सध्या सत्तेच्या मस्तीत आहे. त्यांना अश्या महिला अत्याचाराच्या गंभीर घटनांकडे बघायला वेळ नाही, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

पिडीत महिलेवर तातडीने योग्य उपचार करुन तिला तिची गेलेली दृष्टी पुन्हा कशी मिळेल यासाठी प्रयत्न करण्याच्या व त्या महिलेवर सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना सूसन रुग्णालयाचे डीन डॉ. तांबे यांना दरेकर यांनी दिल्या. भाजपच्यावतीने पिडीत महिलेला व तिच्या कुटुंबियांला नक्कीच न्याय मिळवून देऊ, असा धीर दरेकरांनी पीडित कुटुंबाला दिला.

(Pravin Darekar Meet Shirur Victim)

संबंधित बातम्या

पुणे : शौचास गेलेल्या महिलेवर नराधमाने हल्ला करुन डोळा काढला, शिरुर तालुक्यातील संतापजनक घटना