भिंत ओलांडून चिदंबरम यांना अटक केलेल्या अधिकाऱ्याचा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मान

| Updated on: Jan 26, 2020 | 12:23 PM

माजी अर्थमंत्री पी चिदंबरम (P Chidambaram) यांच्या घराची भिंत ओलांडून त्यांना अटक करणाऱ्या अधिकाऱ्यासह 28 सीबीआय अधिकाऱ्यांना (28 CBI Officers) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आलं

भिंत ओलांडून चिदंबरम यांना अटक केलेल्या अधिकाऱ्याचा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मान
Follow us on

नवी मुंबई : माजी अर्थमंत्री पी चिदंबरम (P Chidambaram) यांच्या घराची भिंत ओलांडून त्यांना अटक करणाऱ्या अधिकाऱ्यासह 28 सीबीआय अधिकाऱ्यांना (28 CBI Officers) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आलं (Republic Day). गेल्यावर्षी आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना अटक करणाऱ्या पोलीस उपअधीक्षक रामास्वामी पार्थसारथी यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आलं. पार्थ सारथी यांनीच चिदंबरम यांना अटक केली होती.

सीबाआयचे सहसंचालक धीरेंद्र शंकर शुक्ला यांनाही विशिष्ट सेवेसोठी राष्ट्रपती पोलीस पदक मिळालं आहे. त्यांनी मुंबईच्या पत्रकार जेडे मृत्यू प्रकरणाचा यशस्वीरित्या तपास केला. तसेच, संयुक्त अरब अमिरातहून (युएई) भारतीय नागरिक रोशन अन्सारी यांना भारतात आणणाऱ्या संघाचं नेतृत्व केले होतं. त्यांनी गुरमीत राम रहीमच्या अनुयायांचा समावेश असलेल्या प्रकरणाचाही तपास त्यांनी केला होता.

पोलीस पदक मिळालेले अधिकारी

विशिष्ट सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये बिनय कुमार, मनोज वर्मा, निर्भय कुमार, रवी नारायण त्रिपाठी, मुकेश वर्मा, नितेश कुमार, बरुण कुमार सरकार, नारायण चंद्र साहू, नंद किशोर, नूर अली शेख आणि रोहिताश कुमार धिनवा यांचा समावेश आहे.

Presidential medal to 28 CBI officers