स्कॉर्पिओच्या किमतीचा ‘सोन्या’, वाशिममधील बोकडाची किंमत…

| Updated on: Jul 19, 2019 | 10:51 AM

जिल्ह्यात सोन्या नावाचा बोकड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा काही साधा बोकड नसून लाख मोलाचा बोकड आहे. या बोकडाची किंमत ऐकून भल्या भल्यांची झोप उडालीय. हैदराबादमधील ग्राहकांनी या बोकडाला तब्बल 11 लाख 75 हजार रुपयांना मागणी केली आहे.

स्कॉर्पिओच्या किमतीचा सोन्या, वाशिममधील बोकडाची किंमत...
Follow us on

वाशिम: जिल्ह्यात सध्या सोन्या नावाचा बोकड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा काही साधा बोकड नसून लाख मोलाचा बोकड आहे. या बोकडाची किंमत ऐकून भल्या भल्यांची झोप उडालीय. कारण या बोकडाच्या किमतीत अगदी स्कॉर्पिओ गाडीही खरेदी करता येईल. स्कॉर्पिओच्या गाड्यांची किंमत 10 लाखापासून 17 लाखापर्यंत आहे. हैदराबादमधील एका ग्राहकांनी या बोकडाला तब्बल 11 लाख 75 हजार रुपयांना मागणी केली आहे. हा बोकड वाशिम जिल्ह्यातील खडकी ढंगारे येथील जिजेबा खडसे यांच्या मालकीचा आहे.

रिसोड तालुक्यातील खडकी ढंगारे येथील जिजेबा खडसे यांच्या शेळीने दीड वर्षांपूर्वी दोन पिल्लांना जन्म दिला. त्यापैकी सोन्या नावाच्या बोकडाच्या डोक्यावर जन्मतःच अर्धचंद्राची खून आहे. मुस्लीम धर्मामध्ये बकरी ईदला अशा बोकडाच्या कुर्बाणीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या बोकडाची किंमत नक्कीच अधिक असते.

जिजेबा यांनी 8 वर्षांपूर्वी  एक बकरी खरेदी केली. त्यांच्या या बकरीला दीड वर्षांपूर्वी दोन पिल्लं झाली. त्यामधील एका बोकडाची 10 हजार रुपयांना विक्री करण्यात आली. मात्र, सोन्याच्या डोक्यावर अर्धचंद्र असल्याने खडसे यांनी या बोकडांची माहिती फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर टाकली. या माहितीवरून हैदराबाद येथील ग्राहकाने या बोकडाची 11 लाख 75 हजार रुपयांना मागणी केली. मात्र, जिजेबा खडसे यांनी आपण हा बोकड 15 लाख रुपयांना विक्री करणार असल्याचे सांगितले.

आमच्या बकरीला 2 पिल्लं झाल्यानंतर आम्ही त्याची लहान मुलांप्रमाणे सोय करत आहोत. त्यांना ताजा भाजीपाला, केळी, शेंगदाणा पेंड लावत असल्यामुळे बोकड चांगला झाल्याचं बोकडाच्या मालकीण लक्ष्मीबाई खडसे यांनी सांगितलं.