‘मेट गाला’च्या लूकमुळे प्रियांका चोप्रा ट्रोल

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

न्यूयॉर्क : बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपली छाप पाडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘मेट गाला’च्या लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. यंदाच्या ‘मेट गाला’मध्ये प्रियांका अनोख्या अंजादात चाहत्यांसमोर आली. पण, तिच्या या वेगळ्या लूकमुळे सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. काहींना तिचा हा लूक आकर्षक वाटत आहे, तर काहींना ती विचित्र वाटत आहे. यंदाच्या […]

मेट गालाच्या लूकमुळे प्रियांका चोप्रा ट्रोल
Follow us on

न्यूयॉर्क : बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपली छाप पाडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘मेट गाला’च्या लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. यंदाच्या ‘मेट गाला’मध्ये प्रियांका अनोख्या अंजादात चाहत्यांसमोर आली. पण, तिच्या या वेगळ्या लूकमुळे सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. काहींना तिचा हा लूक आकर्षक वाटत आहे, तर काहींना ती विचित्र वाटत आहे. यंदाच्या ‘मेट गाला’ची थीम “कॅम्प : नोट्स ऑन फॅशन” ही ठेवण्यात आली आहे.

प्रियांका चोप्रा यंदाच्या ‘मेट गाला’मध्ये पती निक जोनससोबत पोहोचली. तिला बघताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याचं कारण म्हणजे प्रियांकाचा लूक. प्रियांकाने यावेळी ‘मेट गाला’साठी डिझायनर डियॉरने तयार केलेला सॉफ्ट पेस्टल गाऊन परिधान केला होता. या थाय हाय स्लिट गाऊनला तिने शिमरी टाईट्ससोबत पेअर केलं होतं. तिच्या या गाऊनमध्ये गुलाबी आणि पिवळ्या रंगाचे फेदर्स लावलेले होते. तिच्या गाऊन व्यतीरिक्त तिची केशभुषा आणि मेकअपही जबरदस्त केलेला होता. त्यासोबत तिने आकर्षक असा मुकुटही घातला होता. प्रियांकाने तिच्या या लूकमध्ये पिंक लिपस्टिक वापरली आहे, तसेच तिने पिंक आणि शिमरी आयशाडोचा वापर केला आहे. तर तिच्या पापण्या तिने पांढऱ्या रंगाच्या केल्या होत्या.

प्रियांकाने तिच्या या लूकचे काही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले. त्यानंतर प्रियांकाचा हा लूक सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. एकीकडे प्रियांकाच्या चाहत्यांना तिचा हा लूक आकर्षक वाटतो आहे. तर दुसरीकडे अनेकजण प्रियांकाच्या या लूकची खिल्ली उडवत आहेत.

एकाने कमेंट केली की, “तिचे केस एखाद्या घरट्यासारखे दिसत आहेत आणि तिने किती ते पाढंर आयलायनर लावलं आहे. ती सरळ केसांमध्ये किती सुंदर दिसते. हे अत्यंत खराब आहे”.

“या फोटोमध्ये ती तशीच दिसत आहे जशी ती बर्फीमध्ये दिसत होती.”

“जर तुम्हाला प्रियांकाचा हा लूक आवडला नसेल, तर तुम्हाला फॅशनबद्दल काहीही कळत नाही.”

“मला ‘मेट गाला’ न आवडण्याचं हेचं एक कारण आहे. तिथे जाऊन सर्व क्रिएटीव्हीटी विरसरुन जातात. ते जे करतात ते खरचं हास्यास्पद आहे.”


प्रियांका चोप्राचा पती आणि पॉप स्टार निक जोनसही यावेळी वेगळ्या लूकमध्ये दिसला. त्याने पांढऱ्या रंगाच्या पॅण्ट-शर्टसोबत एखाद्या राजाप्रमाणे हातात पांढऱ्या रंगाचा दुपट्टा घेतलेला होता. त्याचा हा लूक ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या पिटर बेलीशसारखा वाटत होता.