‘उमेद’ कायम ठेवण्यासाठी गोंदिया, अकोला, यवतमाळमध्ये महिलांचा मूकमोर्चा

| Updated on: Oct 12, 2020 | 7:33 PM

महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारे 'उमेद' अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. (protest of ten lakh women against the privatization of Umed organization) 

उमेद कायम ठेवण्यासाठी गोंदिया, अकोला, यवतमाळमध्ये महिलांचा मूकमोर्चा
Follow us on

गोंदिया, यवतमाळ, अकोला : महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारे ‘उमेद’ अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अभियानाला जोडलेल्या 50 लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. शासनाकडून मिळणारा निधी ठप्प झाला असून, संस्था मोडकळीस येण्याची भीती निर्माण झाली आहे. महिलांच्या संस्था वाचवून महिलांना मार्गदर्शन करणारे हे अभियान निरंतर सुरू राहावे, अशी राज्यातील महिलांची मागणी आहे. तसेच या अभियानात बाह्य संस्थेचा हस्तक्षेप होऊ नये, या मागणीसाठी 10 लाख महिलांनी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात एल्गार पुकारला आहे. (protest of ten lakh women against the privatization of Umed organization)

राज्यात 2011 पासून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ची (एमएसआरएलएम) अंमलबजावणी होत आहे. या अभियानात काम करण्यासाठी शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. पण आता सरकार या उमेद संस्थेला बाह्य संस्थेच्या हाती देण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात संस्थेतील विविध जिल्ह्यातील कंत्राटी महिलांनी मोर्चा काढला आहे.

महिला मोर्चाचे कारण काय?

‘उमेद’ कार्यक्रमाअंतर्गत राज्यात आतापर्यंत 4 लाख 79 हजार 174 समूह स्थापन करण्यात आले. यामध्ये 49 लाख 44 हजार 656 कुटुंब या कर्मचाऱ्यांनी एकमेकांना जोडले. मात्र, कोणतेही पूर्व सूचना न देता, यवतमाळ जिल्ह्यात वेगवेगळ्या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवा शासनाने अन्यायकारक पद्धतीने समाप्त केल्या आहे. अभियानाशी जोडलेल्या 50 लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग आणखी खडतर झाला. तसेच शासनाकडून मिळणारा निधी ठप्प झाला, त्यामुळे संस्था मोडकळीस येण्याची भीती निर्माण झाली आहे.

नेमक्या मागण्या काय?

गोंदिया जिल्ह्यात हा मोर्चा आमदार विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. तर यवतमाळमध्ये स्वामिनी संघटनेच्या नेतृत्वात बचत गटांच्या महिला रस्त्यावर उतरल्या. अकोला जिल्ह्यातली महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवला. उमेद अभियानाच्या खासगीकरणाविरोधात यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. या अभियानाचे खासगीकरण होत असल्याचा आरोप मोर्चातील महिलांनी केला आहे. मोर्चातील महिलांच्या विविध मागण्या आहेत. उमेद अभियानास मिळणारा निधी शासनाने पूर्वरत करावा. महिलांना मार्गदर्शन करणारे हे अभियान निरंतर सुरूच राहावे. यामध्ये बाह्यसंस्थेचा हस्तक्षेप होऊ नये. अशा विविध मागण्या यावेळी महिलांनी केल्या आहेत.

तीव्र आंदोलनाचा इशारा

कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यामुळे गावातील सर्व बचतगटाची कामे थांबली आहेत. कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी सोमवारी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शासनाने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वामिनीचे मुख्य संयोजक महेश पवार यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

पंढरपुरात मनसे महिला कार्यकर्त्यांचा मोर्चा, बचत गटाचे कर्ज माफ करण्याची मागणी

CAA-NRC वाद : कांजूरमार्ग स्टेशनवर बहुजन क्रांती मोर्चाचं रेल रोको, नागपाड्यात महिलांचं आंदोलन

‘राज्यात दिशा कायदा तात्काळ लागू करा’, भाजपचं राज्यभरात महिला अत्याचारविरोधात आक्रोश मोर्चे

(protest of ten lakh women against the privatization of Umed organization)