दोन महिन्यांपूर्वी पुण्यातील शिक्षक निवृत्त, तरीही वेतन सुरु, शिक्षण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

| Updated on: Aug 20, 2020 | 12:30 AM

मनपाच्या शिक्षण विभागातील 19 शिक्षकांना निवृत्तीनंतर दोन महिने वेतन दिल्याचं समोर आलं (Pune Teacher get salary After retirement) आहे.

दोन महिन्यांपूर्वी पुण्यातील शिक्षक निवृत्त, तरीही वेतन सुरु, शिक्षण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
पुणे महापालिका
Follow us on

पुणे : हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मनपाचं आर्थिक नियोजन बिघडलं आहे. मात्र अशाही परिस्थितीत मनपा प्रशासनाचा अनागोंदी कारभार सुरूच आहे. मनपाच्या शिक्षण विभागातील 19 शिक्षकांना निवृत्तीनंतर दोन महिने वेतन दिल्याचं समोर आलं आहे. मनपाच्या स्थायी समितीमध्ये हा प्रकार समोर आला असून यात दोषींच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. (Pune Teacher get salary After retirement)

दोन महिन्यांपूर्वी पुण्यातील 19 शिक्षक निवृत्त झाले होते. मात्र त्यानंतरही या शिक्षकांना जवळपास दोन महिने वेतन सुरु होते. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

मनपा कोरोनावर मोठ्या प्रमाणात खर्च झाले सांगतं आहे. राज्य सरकारकडून फारशी मदत मिळाली नसल्याचा आरोप होतो आहे. माञ दुसऱ्या बाजूला निवृत्तीनंतरही पगार देण्यात आला आहे. आता या शिक्षकांना नोटीसा पाठवल्या असून काहींनी वेतन परतही केलं आहे.

या प्रकरणी विरोधी पक्षांनी सत्ताधारी हे फक्त टेंडरमध्ये अडकलेत. त्यांचे इतर विभागात लक्ष नसल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केला आहे. तर याबाबत चौकशीचे आदेश दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले. (Pune Teacher get salary After retirement)

संबंधित बातम्या : 

Pune Sero Survey | पुण्यात कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या पाच प्रभागात सिरो सर्व्हे, 51.5 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज

Pune Collector | पुणे जिल्हाधिकारीपदाचा पेच सुटला, राजेश देशमुख यांची वर्णी