पुण्यातील डॉक्टरला दिल्लीत ‘जय श्री राम’ च्या घोषणा देण्याची जबरदस्ती

| Updated on: May 28, 2019 | 4:59 PM

 नवी दिल्ली : अवघ्या काही दिवसांपूर्वी मुस्लीम युवकावर हल्ला करुन त्याला ‘जय श्री राम’ अशी घोषणा देण्याची जबरदस्ती केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर आता दिल्लीत काही अज्ञात तरुणांनी पुण्यातील एका डॉक्टरला ‘जय श्री राम’ अशा घोषणा देण्यास जबरदस्ती केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. डॉ. अरुण गडरे असे या डॉक्टरांचे नाव आहे. ‘हिंदू’ या इंग्रजी […]

पुण्यातील डॉक्टरला दिल्लीत जय श्री राम च्या घोषणा देण्याची जबरदस्ती
Follow us on

 नवी दिल्ली : अवघ्या काही दिवसांपूर्वी मुस्लीम युवकावर हल्ला करुन त्याला ‘जय श्री राम’ अशी घोषणा देण्याची जबरदस्ती केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर आता दिल्लीत काही अज्ञात तरुणांनी पुण्यातील एका डॉक्टरला ‘जय श्री राम’ अशा घोषणा देण्यास जबरदस्ती केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. डॉ. अरुण गडरे असे या डॉक्टरांचे नाव आहे. ‘हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतची वृत्त दिलं आहे.

हिंदू या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, डॉ अरुण गडरे रविवारी 26 मे रोजी दिल्लीत एका व्याख्यानासाठी आले होते. व्याख्यानासाठी जात असताना ते दिल्लीतील कनॉट प्लेस या ठिकाणच्या हनुमान मंदीर परिसरात उभे  होते. त्यावेळी काही अज्ञातांनी त्यांचा रस्ता अडवला. डॉ. गडरेंना रस्त्यावर थांबवत त्यांचा धर्म विचारला. डॉ गडरेंनी मात्र याचं काहीही उत्तर दिले नाही. ते पुढे गेले असता, त्यांना पुन्हा त्या तरुणांनी थांबवले आणि बळजबरी करत ‘जय श्री राम’ अशा घोषणा द्या असे सांगितले. डॉ गडरेंनी असे करण्यास नकार दिला.

दरम्यान सध्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अद्याप डॉ. गडरेंनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही.

डॉ. अरुण गडरे हे पुण्यात राहतात. ते स्त्री रोग विशेषज्ञ आहेत. घटना घडल्यानंतर त्यांनी त्यांचे मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार अनंत बगनेतकर यांना सांगितली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरण समोर आले.

काही दिवसांपूर्वी एका 25 वर्षीय मुस्लीम युवकावर हल्ला करुन त्याला ‘जय श्री राम’ अशी घोषणा देण्याची जबरदस्ती केल्याचं समोर आलं होतं. हरियाणातील गुरुग्राममध्येही ही घटना घडली होती. जामा मश्जिदातून नमाज पठण केल्यानंतर मोहम्मद बरकत नावाच्या व्यक्तीवर 5-6 लोकांनी हल्ला केला. त्याला त्याच्या डोक्यावरील टोपी उतरवायला लावली. त्यानंतर त्याला ‘जय श्री रामा’च्या घोषणाही देण्यास सांगितलं होतं.