पुण्यात कोरोना रुग्णाला बाहेर काढले, दुसऱ्या रुग्णालयाचा शोध, रुग्णवाहिकेतच मृत्यू

| Updated on: Jul 28, 2020 | 11:32 PM

कोरोना रुग्णांवर उपचाराची सोय आमच्याकडे नाही, असे कारण गॅलक्सी रुग्णालयाने (Pune Corona Patient Died due to Lack of Bed) दिले.

पुण्यात कोरोना रुग्णाला बाहेर काढले, दुसऱ्या रुग्णालयाचा शोध, रुग्णवाहिकेतच मृत्यू
Follow us on

पुणे : पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णाला रुग्णालयाने अचानक बाहेर काढले. त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयाच्या शोधात असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पुण्यात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. (Pune Corona Patient Died due to Lack of Bed)

पुण्यातील कर्वे रोड येथील गॅलक्सी रुग्णालयात एका रुग्णाला 11 जुलैला दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 24 जुलैला त्यांना कॅन्सरवर उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर शनिवारी (25 जुलै) पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री त्यांचा कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

मात्र आज सकाळी अचानक गॅलक्सी रुग्णालयाने त्या रुग्णाला रुग्णालयाबाहेर काढले. कोरोना रुग्णांवर उपचाराची सोय आमच्याकडे नाही, असे कारण गॅलक्सी रुग्णालयाने दिले. अचानक रुग्णालयाने बाहेर काढल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

पिंपरी-चिंचवडमधील वायसीएस रुग्णालयात बेड बुक केला आहे, तुमच्या रुग्णालयाला तेथे घेऊन जा, असे ग्लॅक्सी रुग्णालय प्रशासनाने सांगितले. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय वायसीएम रुग्णालयात गेल्यावर तिथे कोणत्याही बेडची सोय नाही, असे सांगितले.

त्यानंतर हा रुग्ण दिवसभर वायसीएम रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकेत बसून होता. त्यानंतर त्यांना संध्याकाळी तळेगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. गॅलक्सी रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

या प्रकरणी गॅलक्सी रुग्णालयाचे डॉक्टर चिप्पा यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, “संबंधित रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह होता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र आमचं हॉस्पिटल कोरोना उपचार करत नसल्याने त्यांना वायसीएमला शिफ्ट करण्यास सांगितलं.

यासंदर्भात वाय सी एम यांच्याशी संवाद साधला होता. त्यांनी जागा असल्याचे सांगितले आणि त्यानंतर रुग्णाला पाठवलं. मात्र त्याचवेळी तिथला एका अत्यवस्थ रुग्णाला अचानक बेड देण्यात आला. त्यामुळे रुग्णाला बॅड मिळाला नाही आणि त्याचा मृत्यू झाला,” असे स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आले. (Pune Corona Patient Died due to Lack of Bed)

संबंधित बातम्या : 

उपासमारीची वेळ आली, आता नाट्य-सिनेमागृहं 1 ऑगस्टपासून सुरु करा, पुण्यातील कलाकारांच्या संस्थांची मागणी

Pune Corona | 31 जुलैपर्यंत पुण्यात 60 हजार कोरोना रुग्ण असतील, अतिरिक्त आयुक्तांची माहिती