Corona | पुण्यात वाहतूक बंद, कोरोनाला रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय

| Updated on: Mar 23, 2020 | 4:45 PM

31 मार्चपर्यंत पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम 144 अन्वये वाहनाचा वापर आणि वाहतुकीला मनाई करण्यात आली आहे.

Corona | पुण्यात वाहतूक बंद, कोरोनाला रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय
Follow us on

पुणे :कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पुणे (Pune Travel Ban Corona) शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. मात्र, तरीही नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत असल्याने वाहनांची गर्दी होत आहे. त्यामुळे आता पुण्यात जमावबंदीसह वाहनबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे (Pune Travel Ban Corona) पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्ग आणि प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून आज 23 मार्च संध्याकाळी 6 वाजेपासून ते 31 मार्च मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम 144 अन्वये वाहनाचा वापर आणि वाहतुकीला मनाई करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस सहआयुक्त यांनी हे निर्देश जारी केले आहेत.

हेही वाचा : कोणाला कोंबडा बनवलं, कोणाला उठाबशा, जमावबंदी आदेश मोडणाऱ्या टवाळांना पोलिसांकडून शिक्षा

यादरम्यान, आवश्यक वाहतूक वगळता सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरु (Pune Travel Ban Corona) आहेत. पुण्यात सकाळी बहुतांश वाहने बाहेर आल्याने, पुणे पोलीस प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

पुण्यात पीएमपीएल सेवाही बंद

पुण्यात पीएमपीएल सेवाही बंद करण्यात आली आहे. पाठपुरावा करुनही बंदचे आदेश न निघाल्याने पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ थेट पीएमपीएल मुख्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी अध्यक्षा नयना गुंडे यांना पीएमपीएल बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आज संध्याकाळी 5 वाजेपासून पीएमपीएल बंद करण्यात आल्या आहे. केवळ अत्यावश्यक सेवेपुरत्याच बस उपलब्ध होणार, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बंद

जमावबंदीमुळे सर्व सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांनी खाजगी वाहनाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. तर टोल नाक्यावर मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे. यात सर्वाधिक खासगी वाहन आहेत.

पुण्यात ‘कोरोना’चा विळखा

पुण्यात ‘कोरोना’चा विळखा वाढत असल्याचं चित्र आहे. परदेशी न जाताच पुण्यातील महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आल्यामुळे चार नातेवाईकही बाधित झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात ‘कोरोना व्हायरस’चा प्रादुर्भाव (कम्युनिटी स्प्रेड) सुरु झाल्याच्या शक्यतेला बळ मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा (Pune Travel Ban Corona) आकडा 15 वर पोहोचला आहे.