Live : शत्रूंच्या मनात धडकी भरवणारं राफेल विमान अंबाला एअरबेसवर दाखल

| Updated on: Jul 29, 2020 | 4:50 PM

शत्रूंच्या मनात धडकी भरवणारा राफेल विमानांचा ताफा भारताच्या अंबाला एअरबेस येथे दाखल झाला आहे (Rafale plane arrives at Ambala airbase).

Live : शत्रूंच्या मनात धडकी भरवणारं राफेल विमान अंबाला एअरबेसवर दाखल
Follow us on

नवी दिल्ली : शत्रूंच्या मनात धडकी भरवणारा राफेल विमानांचा ताफा भारताच्या अंबाला एअरबेस येथे दाखल झाला आहे (Rafale plane arrives at Ambala airbase). या ताफ्यातील पाचही राफेल विमान अंबाला एअरबेसवर दाखल झाले आहेत. भारतीय वायुदलाला या विमानांमुळे प्रचंड मोठी शक्ती मिळणार आहे (Rafale plane arrives at Ambala airbase).

[svt-event title=”आता नव्या युगाची सुरुवात : राजनाथ सिंह” date=”29/07/2020,3:29PM” class=”svt-cd-green” ] भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानांचा ताफा भारतात दाखल झाल्याची माहिती दिली आहे. ही एक नव्या युगाची सुरुवात आहे. राफेल विमान भारतीय वायूसेनेत क्रांतीकारक बदल घडवणार, असं राजनाथ सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी फ्रान्स सरकारचेदेखील आभार मानले

पाच राफेल विमानांनी सोमवारी (27 जुलै) फ्रांसच्या मेरिनैक येथून उड्डाण घेतलं होतं. फ्रान्स ते भारत जवळपास 7 हजार किमीच्या प्रवासादरम्यान या पाचही लढाऊ विमानांना 28 जुलैला (काल) संयुक्त अरब अमीरातच्या (यूएई) अल डाफरा एअरबेसवर येथे थांबा देण्यात आला होता. तिथे इंधन भरल्यानंतर हे विमान भारताच्या दिशेला रवाना झाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

राफेल विमानांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. भारतीय वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया अंबाला एअरबेस येथे दाखल झाले आहेत. पाचही लढाऊ विमानांना भारतीय पायलट उडवत आहेत.

हेही वाचा : चीनचे सर्व फासे उलटे पडणार, भारतीय वायुदलात आकाशातला सर्वात मोठा योद्धा दाखल होणार

दरम्यान, राफेल विमानाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर अंबाला एअरबेस येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अंबाला एअरबेसपासून 3 किमीचा परिसर ‘नो ड्रोन झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. याशिवाय एअरबेसच्या आजूबाजूच्या परिसरात कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय फोटो आणि व्हिडीओ काढण्यास मनाई करण्यात आली आहे.

राफेल विमान

मोदी सरकारने 2016 मध्ये 36 राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्याचा करार फ्रान्सशी केला होता. यापूर्वी यूपीए सरकारच्या काळात 126 राफेल विमानांचा करार झाला होता, मात्र त्यावेळी काही नियम अटींमुळे हा करार पूर्ण होऊ शकला नव्हता. मोदी सरकारने केलेल्या करारावरुन काँग्रेसने घोटाळ्याचा आरोप केला होता. सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण पोहोचलं. पण कोर्टाने मोदी सरकारला क्लीनचीट दिली.

राफेलचं वैशिष्ट्य काय?

  • राफेल एक असं लढाऊ विमान आहे जो एक मिनिटात 60 हजार फूट उंच झेप घेऊ शकतो.
  • राफेलची मारक क्षमता ही जवळपास 3700 किलोमीटर इतकी आहे.
  • हे लढाऊ विमान 2200 ते 2500 किलोमीटर प्रतितास या वेगाने उडू शकतो.
  • यामध्ये मिटीअर मिसाईल आणि इस्त्राईल प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.

राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहार काय आहे?

भारत आणि फ्रान्स यांच्यात 36 राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा व्यवहार 23 सप्टेंबर 2016 रोजी झाला. 7.87 अब्ज युरो म्हणजेच जवळपास 59 हजार कोटी रुपयांचा हा करार आहे. हा व्यवहार दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये झाला. भारताची हवाई ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हा व्यवहार झाला. ही विमानं फ्रान्सची दसॉल्ट कंपनीने तयार केली आहेत. ही विमानं सप्टेंबर 2019 मध्ये भारताला मिळणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 एप्रिल 2015 रोजी फ्रान्स दौऱ्यावर होते, त्यावेळी मोदी आणि फ्रान्सचे तत्कालिन अध्यक्ष फ्रांसवा ओलांद यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या व्यवहाराची माहिती दिली होती.

संबंधित बातम्या :

Rafale | भारतीय वायुदलाचे सामर्थ्य वाढणार, फ्रान्सहून पाच राफेल विमाने रवाना

भारताकडून चीनला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी, लडाख सीमेवर राफेल तैनात होणार