भारतात येण्याआधीच राफेलच्या कामगिरीची चर्चा, चीनसारख्या देशाला भीती का वाटते?

राफेलचा बोलबाला हा फक्त त्याच्या चर्चेनं नाही, तर त्याच्या घातक मिसाईल्सनीसुद्धा निर्माण केला आहे (Dassault Rafale aircraft).

भारतात येण्याआधीच राफेलच्या कामगिरीची चर्चा, चीनसारख्या देशाला भीती का वाटते?

नवी दिल्ली : राफेल विमान (Dassault Rafale aircraft) 29 जुलै रोजी दुबई मार्गाने भारतात दाखल होणार आहे. मात्र, राफेल भारतात दाखल होण्यापूर्वीच राफेलच्या करामतीच्या चर्चा रंगल्या आहेत. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या वायुदलांकडे सध्या राफेलच्या तोडीचं एकही विमान नाही. त्यामुळे दोन्ही देश दचकले आहेत (Dassault Rafale aircraft).

युद्धाच्या जय-पराजयाचे झेंडे सध्या वायुदलाच्या भरवश्यावरच फडकतात. अमेरिकेला इतर देश दचकून राहतात, त्यामागे अमेरिकेचं वायुदल हे प्रमुख कारण आहे. अमेरिकन वायुदलाच्या ताफ्यात F-22 आणि F-35 ही जगातली सर्वात आधुनिक विमानं आहेत. या दोन्ही विमानांच्या पुढे सध्या जगातलं कोणतंही विमान एक मिनिटाहून जास्त काळ टिकू शकणार नाही. त्यामुळेच अमेरिकेला समुद्राबरोबरच आकाशातीलही महासत्ता मानलं जातं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

कोणत्याही विमानाची ताकद ही त्याची सेंसर क्षमता आणि त्या विमानाला लागलेल्या शस्रांवरुन ठरवली जाते. सेंसरच्या जोरावरच विमान लांबवरपर्यंत अचूक मारा करतात, शस्रांच्या जोरावर शत्रूचे अड्डे जमिनदोस्त केले जातात. या दोन्ही खुब्यांनी राफेल फायटर परिपूर्ण आहे. भारतात येणारी राफेल विमानं किती विध्वंसक आहेत, याची पहिली प्रचिती अफगाणिस्तानच्या युद्धावेळी आली. त्यावेळी पहिल्यांदाच जगाला राफेलची ताकद कळाली होती.

मागच्या 19 वर्षांपासून अफगाणिस्तान आणि तालिबान्यांमध्ये युद्ध सुरु आहे. मात्र 2006 ते 2011 या काळात फ्रान्सनं राफेल विमानांना अफगाणच्या मैदानात उतरवलं होतं. त्यानंतर एक-दोन नव्हे तर तब्बल 6 वर्ष राफेल विमानांच्याच मदतीनं फ्रान्सनं तालिबान्यांवर हल्ले चढवले.

हेही वाचा : चीनचे सर्व फासे उलटे पडणार, भारतीय वायुदलात आकाशातला सर्वात मोठा योद्धा दाखल होणार

अफगाणिस्ताननंतर 2011 मध्ये राफेलला लिबियाच्या मोहिमेवर पाठवलं गेलं. 2011 पर्यंत राफेल नव्या रुपात आणि नव्या ताकदीनं सज्ज झालं. त्यामुळे लिबियाच्या मोहिमेवरही राफेलनं शत्रूला घाम फोडला. तेव्हा डझनभर देशांनी आपापल्या बलाढ्य विमानांना उतरवलं होतं. मात्र राफेलचा वार आणि राफेलचा अचूक नेम याबाबत कोणतंही विमान राफेलला मागे टाकू शकलं नाही.

चीनसारख्या देशाला राफेलची भीती का वाटते?

मिटिऑर मिसाईल हे राफेलचं पहिलं वैशिष्ठ्य आहे. सर्वात घातक असलेली मिटिऑर मिसाईल ही एक व्हिज्युअल रेंज मिसाईल आहे. टार्गेट कितीही वेगानं धावत असलं, तरी ते एकदा राफेलच्या रेंजमध्ये लॉक झालं तरी त्याचा खात्मा अटळ असतो.

मिटिऑर मिसाईलची मारक क्षमता 150 किलोमीटर आहे. त्याची लांबी 12 फूट आणि वजन तब्बल 190 किलो असतं. हवेतून येणारा प्रत्येक वार मिटिऑर मिसाईल परतवून लावते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिटिऑर मिसाईल ही टू-वे डेटा लिंकशी जोडलेली असते, म्हणजे राफेलमधून सुटल्यानंतरही त्या मिसाईलचं लक्ष्य बदलता सुद्धा येतं. सध्या मिटिऑर मिसाईलच्या तोडीची चीन आणि पाकिस्तानकडे एकही मिसाईल नाही. त्याशिवाय स्कैल्प मिसाईल हे दुसरं शस्रं राफेलला घातक बनवतं.

तब्बल 300 किलोमीटरची मारक क्षमता असलेली ही मिसाईल शत्रूच्या हद्दीत न शिरता सुद्धा विध्वंस घडवू शकते.  या दोन्ही मिसाईल्सनी अफगाणिस्तान आणि लिबियातल्या युद्धावेळी जगाचं लक्ष वेधलं होतं. तेव्हापासून जगभरातल्या वायुदलांमध्ये राफेल विमानांची दहशत आहे. त्याच दहशतीची भीती सध्या चीन आणि पाकिस्तानच्या सीमाभागात दिसू लागली आहे.

राफेलचा बोलबाला हा फक्त त्याच्या चर्चेनं नाही, तर त्याच्या घातक मिसाईल्सनी सुद्धा निर्माण केला आहे.  राफेल हे अनेक वर्ष प्रत्यक्ष मैदानात झुंजलेलं फायटर प्लेन आहे. त्याच्या झुंजारुपणाचा फक्त अनुभवच शत्रूला  गलितगात्र करण्यासाठी पुरेसा आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI