Mahayuti Govt One Year : अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं… भाजप नेत्याचा ठाकरेंना टोला
महायुती सरकारच्या एका वर्षाच्या पूर्ततेनिमित्त अमित साटम यांनी गेल्या 11 वर्षांतील महाराष्ट्राच्या प्रगतीवर भाष्य केले. अडीच वर्षांचा स्पीड ब्रेकर वगळता, समृद्धी महामार्ग, अटल सेतू यांसारख्या विकासकामांवर त्यांनी प्रकाश टाकला. मुंबईतील रस्त्यांच्या समस्या, अधिकारी निलंबन आणि आगामी महानगरपालिका निवडणुकांवरही त्यांनी भूमिका मांडली.
महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप आमदार अमित साटम यांनी राज्याच्या प्रगतीवर महत्त्वपूर्ण भाष्य केले. यावेळी अडीच वर्षांचा स्पीड ब्रेकर वगळता, महाराष्ट्राने गेल्या 11 वर्षांत मोठी प्रगती केली आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली. तर एका सर्वेक्षणानुसार, गेल्या एक वर्षातील प्रगतीवर 70% जनता समाधानी असल्याचे साटम यांनी नमूद केले. मुंबईतील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबतच्या तक्रारी मान्य करत, साटम यांनी रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. 45% काम पूर्ण झाले असून, पुढील दोन-तीन वर्षांत मुंबईतील रस्त्यांची समस्या पूर्णपणे दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, विकास कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

