Hatti Lake | रायगडावरील ऐतिहासिक हत्ती तलाव दीडशे वर्षानंतर पूर्ण भरला

| Updated on: Jul 11, 2020 | 6:39 PM

गेल्या कित्येक वर्षात हा तलाव इतक्या प्रमाणात कधीही भरला नव्हता, असा दावा रायगडावरील स्थानिकांनी केला आहे.

Hatti Lake | रायगडावरील ऐतिहासिक हत्ती तलाव दीडशे वर्षानंतर पूर्ण भरला
Follow us on

रायगड : दुर्गराज रायगडावरील ऐतिहासिक हत्ती तलाव पूर्ण (Hatti Lake Filled Up) क्षमतेने भरला आहे. गेल्या कित्येक वर्षात हा तलाव इतक्या प्रमाणात कधीही भरला नव्हता, असा दावा रायगडावरील स्थानिकांनी केला आहे. जवळपास दीडशे वर्षानंतर हा तलाव पुर्णक्षमतेने भरला असेल, असं स्थानिक रहिवासी सांगत आहेत (Hatti Lake Filled Up).

छत्रपती संभाजीराजेंच्या अध्यक्षतेखाली ‘रायगड विकास प्राधिकरण’च्या माध्यमातून रायगड किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनाचे काम सुरु आहे. आता हा तलाव पूर्ण क्षमतेन भरल्यानंतर रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“असे क्षण जीवनात खूप कमी येतात! ज्याचं समाधान आयुष्यभर लाभतं. सर्व शिवभक्तांना सांगताना आनंद होत आहे, की रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून आपण जे काही काम हाती घेतले, त्याला यश येत आहे. हत्ती तलावाचे 80% काम पूर्ण झाले असून तलावाला अजूनही एक जागेत गळती आहे. त्या गळतीचा व्यवस्थित अभ्यास करुन ती सुद्धा काढून घेतली जाईल”, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गडाच्या संवर्धनासाठी सुरु असलेल्या कामाला यश येत असल्याचे पाहून आनंद होत असल्याच खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं.

Hatti Lake Filled Up

संबंधित बातम्या :

पुढील पाच दिवसात विदर्भात तुरळक पाऊस, नागपूर हवामान विभागाचा अंदाज

SARTHI Meeting | अजित पवारांचा धडाका, दोन तासात ‘सारथी’ला 8 कोटी, परिपत्रक जारी