रणवीरने स्वत:चेच विक्रम मोडले, ‘सिंबा’च्या पहिल्या दिवसाची कमाई तब्बल…

| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई : अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या ‘सिंबा’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर एक जबरदस्त ओपनिंग मिळाली. या सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईने रणवीरच्या इतर सर्व सिनेमांचे पहिल्या दिवसाच्या कलेक्शनचे रेकॉर्ड तोडले आहेत. या सिनेमाने पहिल्याच दिवशी तब्बल 20 कोटी 72 लाख रुपयांची कमाई केली. याआधीपर्यंत रणवीरचा ‘पद्मावत’ त्याच्या सिनेमांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईत पहिल्या […]

रणवीरने स्वत:चेच विक्रम मोडले, ‘सिंबा’च्या पहिल्या दिवसाची कमाई तब्बल...
Follow us on

मुंबई : अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या ‘सिंबा’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर एक जबरदस्त ओपनिंग मिळाली. या सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईने रणवीरच्या इतर सर्व सिनेमांचे पहिल्या दिवसाच्या कलेक्शनचे रेकॉर्ड तोडले आहेत. या सिनेमाने पहिल्याच दिवशी तब्बल 20 कोटी 72 लाख रुपयांची कमाई केली. याआधीपर्यंत रणवीरचा ‘पद्मावत’ त्याच्या सिनेमांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईत पहिल्या क्रमांकावर होता. पद्मावतने पहिल्या दिवशी 19 कोटींचा गल्ला जमवला होता.

 

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या या सिनेमाची प्रदर्शना आधीही खूप चर्चा झाली. तसेच या सिनेमाचा ट्रेलरही हिट झाला होता. या सिनेमाच्या ‘आंख मारे’ या गाण्याने अक्षरश: प्रेक्षकांना वेड लावले. त्यातच आता या सिनेमाने इतकी जबरदस्त सुरुवात केली.


कॉमेडी आणि अॅक्शनचं जबरदस्त कॉब्मीनेशन असलेला ‘सिंबा’ शाहरुखच्या ‘झिरो’वरही भारी पडला.  सिनेमा समीक्षक तरण आदर्श यांच्यानुसार येत्या दिवसांत हा सिनेमा आणखी चांगली कमाई करु शकतो.


याआधी रणवीरच्या ‘पद्मावत’ या सिनेमाने पहिल्या दिवशी 19 कोटींची कमाई केली होती, ‘गुंडे’ या सिनेमाने पहिल्या दिवशी 16 कोटी 12 लाख इतका गल्ला जमवला होता. ‘गोलियो की रास लीला : राम लीला’ने पहिल्या दिवशी 16 कोटी कमवले होते, तर ‘बाजीराव मस्तानीने’ पहिल्या दिवशी 12 कोटी 80 लाखाची कमाई केली होती. तर सारा अली खान हिचा हा दुसराच सिनेमा आहे. तिने याआधी ‘केदारनाथ’ या सिनेमात काम केले, ‘केदारनाथ’ने पहिल्या दिवशी 7 कोटी 25 लाखाची कमाई केली. त्यामुळे ‘सिंबा’ हा कमाईच्या बाबतीत रणवीर आणि सारा दोघांसाठीही खूप महत्वाचा सिनेमा ठरतो आहे.

‘सिंबा’ला एकूण 4,983 स्क्रीन्सवर प्रदर्शीत करण्यात आले. ज्यापैकी भारतात 4,020 तर ओव्हरसीजमध्ये 963 स्क्रीन्सवर हा सिनेमा प्रदर्शीत करण्यात आला.