बलात्कारातील दोषी राम रहिम तुरुंगाबाहेर येणार?

| Updated on: Jun 25, 2019 | 8:33 AM

बलात्काराच्या 2 प्रकरणांमध्ये 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला गुन्हेगार राम रहिम तुरुंगातून बाहेर येण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. हरियाणा सरकार देखील त्याला सहकार्य करत असल्याचे बोलले जात आहे.

बलात्कारातील दोषी राम रहिम तुरुंगाबाहेर येणार?
Follow us on

नवी दिल्ली: बलात्काराच्या 2 प्रकरणांमध्ये 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला गुन्हेगार राम रहिम तुरुंगातून बाहेर येण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. हरियाणा सरकार देखील त्याला सहकार्य करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कायदा धाब्यावर बसवून राम रहिम तुरुंगाबाहेर आल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी स्थिती तयार झाली आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, तुरुंग मंत्री कृष्ण पवार आणि आरोग्य मंत्री अनिल विज यांनी स्वतः गुरमीत राम रहीमला पॅरोल देण्याला समर्थन दिले आहे. अनिल विज यांनी तर गुरमीत राम रहिमला सामान्य व्यक्तीचा अधिकार पॅरोल मिळायला हवा, तो त्याचा अधिकार आहे, असेही म्हटले.

नियमांनुसार 2 वर्ष शिक्षा भोगल्यानंतरच पॅरोल दिला जाऊ शकतो. मात्र, गुरमीत राम रहिमने 2 वर्ष पूर्ण होण्याआधीच पॅरोलसाठी अर्ज केला आहे. दुसरीकडे राम रहिम ज्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे त्या तुरुंग प्रशासनाने देखील शिक्षेची अट पूर्ण केलेली नसतानाही त्याचा अर्ज स्वीकारला आहे. यावरुन राम रहिमचा दबदबा अजूनही शिल्लक असल्याचे बोलले जात आहे.

यावर्षी ऑक्टोबरमध्ये हरियाणात विधानसभा निवडणुका होत आहेत. गुरमीत राम रहीमच्या आश्रमाचे मुख्यालय सिरसामध्ये आहे. हरियाणामध्ये त्याचे लाखो अनुयायी आहेत. गुरमीत राम रहिमने भाजपला निवडणुकीत मदत करण्याचे आश्वासन दिल्यानेच पॅरोल दिला जात असल्याचीही चर्चा सुरु आहे. असे झाल्यास भाजपला सत्तेचे गणित करणे सोप होणार आहे, तर दुसरीकडे राम रहिमलाही तुरुंगाबाहेर येऊन मोकळा श्वास घेता येणार आहे.

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी काही पावले उचलत राम रहिमचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला असला, तरी चहुबाजूंनी या निर्णयाला विरोध होत आहे. हरियाणाच्या गृहमंत्रालयाकडे राम रहिमचा पॅरोल अर्ज मिळाल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, हरियाण सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचेही सांगण्यात आले.