ना लुडो, ना पत्ते, लॉकडाऊनमध्ये विहीर खोदली, विहिरीचं नाव ठेवलं……

| Updated on: Jul 24, 2020 | 5:29 PM

लॉकडाऊनचा सदुपयोग करुन विहीर खोदली. लॉकडाऊनमध्ये ही विहीर खोदल्याने या विहिरीला 'लॉकडाऊन विहीर' असे नाव देण्यात आलं आहे. (Ratnagiri lockdown well)

ना लुडो, ना पत्ते, लॉकडाऊनमध्ये विहीर खोदली, विहिरीचं नाव ठेवलं......
Follow us on

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात पत्ते आणि मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा मोकळ्या वेळेचा सदुपयोग केला तर त्याचं फळ चांगलंच मिळतं हे रत्नागिरीत समोर आलं आहे. रत्नागिरी तालुक्यातील वेळवंडमधल्या भायजेवाडीतील ग्रामस्थांनी तब्बल 40 फूट खोल विहीर खोदली. जोरदार पवासामुळे सध्या ही विहीर तुडुंब भरली आहे. लॉकडाऊनमध्ये ही विहीर खोदल्याने या विहिरीला ‘लॉकडाऊन विहीर’ असे नाव देण्यात आलं आहे. (Ratnagiri lockdown well)

लॉकडाऊनमध्ये रत्नागिरी तालुक्यातील वेळवंडमधल्या भायजेवाडीतील 10 घरांची भायजे भावकी. वाढती कुटुंब संख्या त्यात दिवसेंदिवस पाण्याची वाढणारी गरज लक्षात घेऊन, त्यांनी लॉकडाऊनमध्ये विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. केवळ निर्णयावर न थांबता, त्यांनी प्रत्यक्ष तीन महिन्यांच्या कालावधीत 40 फूट विहीर खोदली. (Ratnagiri lockdown well)

महादेव गोपाळ भायजे यांनी आपल्या कुटुंबाच्या वाट्याला आलेल्या जमिनीत विहीर खोदण्यासाठी जागा दिली. तरुण मुलांना विहीर खोदण्याचा अनुभव नव्हता. काही तरुण मुंबईतून आलेले, तर काही रंगकाम,बांधकाम करणारे होते. पण जुन्या-जाणत्या लोकांच्या मार्गदर्शनखाली सतत तीन महिने मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर विहीर खोदली. सध्या या विहिरीला पाणीही मुबलक आहे.

ही विहीर खोदण्याच्या कामात महिलांचाही वाटा खूप मोठा असल्याचे ग्रामस्थ तुकाराम भायजे यांनी सांगितले. नारायण भायजे, गणपत भायजे यांच्यासारख्या अनुभवी लोकांचं मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळे लॉकडाऊनचा खरा उपयोग करता आला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. लॉकडाऊनमध्ये ही विहीर खोदल्याने या विहिरीला ‘लॉकडाऊन विहीर’ असे नाव देण्यात आलं आहे. पण एकूणच लॉकडाऊनमधला वेळ सत्कारणी लावत या ग्रामस्थांनी जे काम केलं आहे ते नक्कीच आदर्शवत असंच आहे.

(Ratnagiri lockdown well)

संबंधित बातम्या 

Lockdown Special | 21 दिवसात 25 फूट विहीर खोदली, वाशिमच्या पाकमोडे दाम्पत्याचं सर्वत्र कौतुक

लॉकडाऊनमध्ये जबरदस्त काम, शेतकऱ्याने पत्नीच्या साथीने 25 फूट विहीर खोदली 

लॉकडाऊनमुळे 10 बाय 10 च्या घरात लग्न, पोलीस वऱ्हाडी, 5-6 जणांची हजेरी

पोलीस मामाच्या भूमिकेत, लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या सीमेवरच शुभमंगल