लॉकडाऊनमध्ये जबरदस्त काम, शेतकऱ्याने पत्नीच्या साथीने 25 फूट विहीर खोदली

लॉकडाऊनमध्ये जबरदस्त काम, शेतकऱ्याने पत्नीच्या साथीने 25 फूट विहीर खोदली

जगभरासह देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून 25 मार्च रोजी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात (couple dug well washim) आला होता.

सचिन पाटील

| Edited By:

Apr 19, 2020 | 5:16 PM

वाशिम : जगभरासह देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून 25 मार्च रोजी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात (couple dug well washim) आला होता. त्यानंतर या लॉकडाऊनमध्ये वाढ करत 3 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये सर्व नागिरक घरात असल्यामुळे प्रत्येकजण वेळ घालवण्यासाठी काही ना काही नवीन गोष्टी शिकत आहेत. तर कुणी घरातील कामं करत आहेत. या दरम्यान वाशिम जिल्ह्यातील एका दाम्पत्याने चक्क 25 फूट खोल विहीर खोदली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे सध्या संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कौतुक केले (couple dug well washim) जात आहे.

वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील गजानन पकमोडे आणि पत्नी पुष्पा पकमोडे या दोघांनी आपल्या घराच्या अंगणात ही विहीर खोदली आहे. विशेष म्हणजे ही विहीर 25 फूट खोदल्यानंतर यामध्ये पाणी लागल्याने त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं आहे.

मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील गजानन पकमोडे हे गवंडी काम करतात. मात्र राज्यात लॉकडाऊन असल्याने काम बंद असून जिल्हा प्रशासनाने बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळं घरच्या घरी काही तरी करायचं हा हेतू समोर ठेवून या दाम्पत्याने पाणी टंचाईवर मात करण्यासाठा विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. सध्या या दाम्पत्याचे ग्रामस्थांकडून कौतुक केलं जात आहे.

दरम्यान, राज्यासह देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आतापर्यंत राज्यात 3320 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 201 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या आजारातून 331 कोरोनामुक्त झाले आहेत.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें