‘नाईट लाईफ म्हणजे काय?’ आर्चीला इंग्लिशमध्ये सांगितलेलंच कळलं नाही!

| Updated on: Jan 31, 2020 | 10:29 AM

अभिनेत्री रिंकू राजगुरु पुण्यात 'मेकअप' सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली, तेव्हा 'नाईट लाईफबद्दल काय सांगाल?' असा प्रश्न तिला विचारण्यात आला.

नाईट लाईफ म्हणजे काय? आर्चीला इंग्लिशमध्ये सांगितलेलंच कळलं नाही!
Follow us on

पुणे : ‘मराठीत सांगितलेलं कळत नाही का? इंग्लिशमध्ये सांगू’ असं ‘सैराट’ चित्रपटात तोऱ्यात विचारणारी आर्ची तुम्हाला आठवत असेल. पण ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रिंकू राजगुरुला ‘नाईट लाईफ’चा अर्थ माहित नाहीये. ‘नाईट लाईफ’ अर्थात ‘मुंबई 24 तास’ या संकल्पनेबद्दल सोलापूरची रिंकू अनभिज्ञ (Rinku Rajguru on Night Life) आहे.

मुंबईतील नाईट लाईफवरुन सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या मनातील या नव्या संकल्पनेची माहिती सर्वच चित्रपट कलाकारांपर्यंत पोहचलेली दिसत नाही. अभिनेत्री रिंकू राजगुरु पुण्यात ‘मेकअप’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. त्यावेळी ‘नाईट लाईफबद्दल काय सांगाल?’ असा प्रश्न तिला विचारण्यात आला.

पत्रकारांच्या प्रश्नावर ‘नाईट लाईफ म्हणजे?’ असा प्रतिप्रश्न रिंकूने विचारला. रिंकूचा प्रश्नार्थक चेहरा पाहून चित्रपटातील तिचा सहकलाकार चिन्मय उदगीरकर मदतीला धावून आला. चिन्मयने तिला ‘नाईट लाईफ’विषयी सांगितलं. त्यावर, रिंकूने ‘सॉरी, नाईट लाईफवर मला काही बोलायचं नाही’ असं म्हणत उत्तर देण्याचं टाळलं.

सात फेब्रुवारीला ‘मेकअप’ सिनेमा रिलीज होत आहे. रिंकू आणि चिन्मय यांनी ‘मेकअप’ सिनेमाविषयी, चित्रपटाचा आशय, चित्रीकरणाच्या वेळचे अनुभव आणि किस्से सांगितले.

‘सैराट’ चित्रपटातून रिंकू राजगुरु हे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहचलं. पदार्पणातील चित्रपटातच रिंकूला मोठं यश मिळालं. त्यानंतर ती ‘कागर’ चित्रपटात झळकली. पुढच्या आठवड्यात तिचा ‘मेकअप’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रिंकू पहिल्यांदाच मॉडर्न तरुणीची व्यक्तिरेखा साकारत आहे.

मुंबईत 26 जानेवारीपासून ‘नाईट लाईफ’ सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. मुंबईतील मरीन ड्राईव्ह, बीकेसी, लोअर परेल भागात नाईट लाईफ सुरु करण्यात आलं आहे. सरकारच्या या निर्णयाला कोणी विरोध केला, तर काही जणांनी समर्थनही केलं आहे.

व्हिडीओ :

Rinku Rajguru on Night Life