वीज वितरण कार्यालयातून दोन लाखांचा माल लंपास, गोंदियातील धक्कादायक प्रकार

| Updated on: Nov 11, 2020 | 5:29 PM

गोंदियाच्या वीज वितरणच्या कार्यालयातून तब्बल दोन लाखांचा माल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

वीज वितरण कार्यालयातून दोन लाखांचा माल लंपास, गोंदियातील धक्कादायक प्रकार
Follow us on

गोंदिया : गोंदियाच्या वीज वितरणच्या कार्यालयातून तब्बल दोन लाखांचा माल चोरीला गेल्याची (Robbery In MAHAVITARAN Office) धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे (Robbery In MAHAVITARAN Office).

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गोंदियातील सुर्याटोला येथील खुल्या जागेत तारांचे वॉलकंपाउंड असलेल्या परिसरातील ठेवलेल्या भांडारातून दोन लाख रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. या संदर्भात रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरी गेलेल्या सामानात डिस्ट्रीब्युशन बॉक्सच्या तांब्याचा पट्या ठेवलेले बॉक्स, असे एकूण 1 लाख 61 हजार रुपये किमतीचे 20 बॉक्स, स्टे प्लेट 50 नग किंमत 12 हजार 750 रुपये, स्टे रॉड 25 नग किंमत 7 हजार 500 रुपये, एलबो 17 नग किंमत 3 हजार 485 रुपये, आयबोल्ट 10 नग किंमत एक हजार 550 रुपये, युबोल्ट 4 नग किंमत एक हजार 56 रुपये, एमएस बोल्ट 10 किलो किंमत 4 हजार 860 रुपये, जीआय तार 100 किलो किंमत 6 हजार रुपये, एबी स्वीच रॉड 5 नग किंमत 2 हजार 700 रुपये असा एकूण 2 लाख 901 रुपयांच्या मालाचा समावेश आहे.

या प्रकरमी प्राची विठ्ठल काळे यांच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांना भादंविच्या कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Robbery In MAHAVITARAN Office

संबंधित बातम्या :

टेनिस बॉलमधून कैद्यांना गांजाचा पुरवठा, पुण्यातील तिघांना कोल्हापुरात अटक

दिवाळीसाठी आलेल्या पाहुण्याची हजार रुपयांसाठी हत्या, चोरट्याला अटक

उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमधून चांदीची बंदूक चोरीला, चोरटा गजाआड