ताम्हिणी घाटात मृतदेह सापडलेल्या RTI कार्यकर्त्याच्या हत्येचं कारण उघड

| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

पुणे: माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांच्या मारेकऱ्याला अटक करण्यात आली आहे. धरमप्रकाश कतार्राम वर्मा असं या 38 वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो रिव्हर व्ह्यूव सोसायटी, शिवणे इथला रहिवाशी आहे. विनायक शिरसाट यांची हत्या  माहिती अधिकार कायद्याच्या वापरामुळे नव्हे तर पैशाच्या देवाण घेवाणीवरुन झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. ताम्हिणी घाटात मृतदेह  विनायक शिरसाट यांचा […]

ताम्हिणी घाटात मृतदेह सापडलेल्या RTI कार्यकर्त्याच्या हत्येचं कारण उघड
Follow us on

पुणे: माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांच्या मारेकऱ्याला अटक करण्यात आली आहे. धरमप्रकाश कतार्राम वर्मा असं या 38 वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो रिव्हर व्ह्यूव सोसायटी, शिवणे इथला रहिवाशी आहे. विनायक शिरसाट यांची हत्या  माहिती अधिकार कायद्याच्या वापरामुळे नव्हे तर पैशाच्या देवाण घेवाणीवरुन झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

ताम्हिणी घाटात मृतदेह 

विनायक शिरसाट यांचा मृतदेह 12 फेब्रुवारीला ताम्हिणी घाटात सापडला होता. विनायक शिरसाट यांची हत्याच झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यावेळी पोलिसांनी वर्तवला होता.  32 वर्षीय विनायक शिरसाट यांचा मृतदेह ताम्हिणीजवळ मुळशी मुठा घाटात सापडला. विनायक शिरसाट 30 जानेवारीपासून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता होते. त्याबाबतची तक्रार कुटुंबीयांनी दिली होती.

विनायक शिरसाट हे आरपीआयचे कार्यकर्ते होते. ते शिवणे या गावचे रहिवासी होते. त्यांचा पीओपीचं व्यवसाय होता. शिरसाट यांनी पुण्यातील वारजे आणि आसपासच्या परिसरातील अनेक जमीन घोटाळे बाहेर काढले होते.

संबंधित बातम्या 

पुण्यातील RTI कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात आढळला