नागपुरात दुहेरी हत्याकांड, मुख्याध्यापिकेसह मामाची हत्या

| Updated on: Feb 05, 2020 | 6:35 PM

भारतीय ज्ञानपीठ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा नाटेकर (55) आणि त्यांचे मामा अशोक काटे (70) यांची हत्या करण्यात आली (Nagpur school Headmaster murder) आहे.

नागपुरात दुहेरी हत्याकांड, मुख्याध्यापिकेसह मामाची हत्या
Follow us on

नागपूर : भारतीय ज्ञानपीठ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा नाटेकर (55) आणि त्यांचे मामा अशोक काटे (70) यांची हत्या करण्यात आली (Nagpur school Headmaster murder) आहे. सक्करदार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तात्रय नगरमध्ये हे दुहेरी हत्याकांड घडलं आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे नागपूर चांगलंच हादरलं आहे. याप्रकरणी मृत मनीषा नाटेकर यांचे पती फरार असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा नाटेकर यांचे मामा अशोक काटे हे जवाहर नगर येथे राहतात. पण काही दिवसांसाठी ते मनीषा यांच्याकडे राहायला आले होते. मनीषा नाटेकर या भारतीय ज्ञानपीठ प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांना एक मुलगा असून तो नोकरीनिमित्त पुण्यात असतो.

मनीषा नाटेकर शनिवारी (1 फेब्रुवारी) शाळेत गेल्या होत्या. त्यानंतर रविवारी (2 फेब्रुवारी) शाळेला सुट्टी असल्याने त्या घरी होत्या. यानंतर सोमवारी शेवटच्या शेजारी राहणाऱ्यांना त्या दिसल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या दिसल्या नाहीत. त्यांचे घरही बाहेरुन बंद होतं. त्यामुळे शेजाऱ्यांनी आजूबाजूला शोधाशोध केली.

दरम्यान मनीषा काटे यांची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली आहे. तर त्यांचे मामा अशोक काटे यांचा गळा घोटून हत्या करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी मनीष नाटेकर आणि अशोक काटे यांची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली (Nagpur school Headmaster murder) आहे.