वॉकी टॉकीच्या सहाय्याने दारुविक्री, आंबेगावात पती-पत्नीला बेड्या, शौचालयात दारुच्या बाटल्यांचा ढीग

| Updated on: Oct 10, 2020 | 5:39 PM

वॉकी-टॉकीच्या सहाय्याने दारू विक्री करणाऱ्या पती पत्नीसह दीर अशा तिघांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वॉकी टॉकीच्या सहाय्याने दारुविक्री, आंबेगावात पती-पत्नीला बेड्या, शौचालयात दारुच्या बाटल्यांचा ढीग
Follow us on

पुणे : वॉकी-टॉकीच्या सहाय्याने दारू विक्री करणाऱ्या पती पत्नीसह दीर अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून 1.73 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नीलेश बबन काळे, संतोष काळे आणि नीता काळे यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Selling Liquor With the Help Of Walkie talkie In Pune Registerd FIR)

आंबेगाव तालुक्यातील मौजे भावडी येथील हॉटेल मनोरंजनमध्ये नीलेश काळे आणि संतोष काळे हे दारुविक्री करत होते. त्यासाठी ते काऊंटरवरुन मागील रुममध्ये असलेल्या वॉकी-टॉकीवरुन कॉल देऊन, ग्राहकांच्या गरजेनुसार दारु मागवत होते.

या वॉकी-टॉकीचा वापर करुन बेकायदेशीर दारु विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि मंचर पोलिसांनी हॉटेल मनोरंजन इथे छापा टाकला. त्यावेळी निलेश काळे हा मागील दरवाजातून पळून गेला.

हॉटेलची झडती घेतली असता, काऊंटरजवळ देशी-विदेशी दारु आढळून आली. पोलिसांनी रुमचे कुलुप तोडून तपास करता रूमचे शौचालय आणि बाथरूम मध्ये देशी विदेशी दारूचा साठा आढळला.

याठिकाणाहून 1 लाख 69 हजार 910 रुपयांची देशी-विदेशी दारु आणि चार हजार रुपयांच्या दोन वॉकी टॉकी असा एकूण 1 लाख 73 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (selling Liquor With the Help Of Walkie talkie In Pune Registerd FIR)

संबंधित बातम्या

नालासोपाऱ्या रुग्णवाहिकेतून अवैधरित्या दारुची वाहतूक, तीन लाखांपेक्षा अधिक दारुसाठा जप्त

दारु विकणारा खासदार नको, विविध संघटनांच्या भूमिकेने बाळू धानोरकर अडचणीत