अनेक कृत्ये करुनही माझं नाव ‘मी टू’मध्ये आलं नाही: शत्रुघ्न सिन्हा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

मुंबई : ‘मी अनेक कृत्ये केली, मात्र तरीही माझं नाव ‘मी टू’मध्ये आलं नाही’, असं वक्तव्य अभिनेते आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केलं. तसेच प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या विनाशामागेही एका महिलेचाच हात असतो, असेही ते म्हणाले. लेखक धृव सोमानी यांचे पुस्तक ‘अ टच ऑफ एविल’च्या उद्गाटनप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यासोबतच ‘मी टू आंदोलनाची चेष्टा […]

अनेक कृत्ये करुनही माझं नाव मी टूमध्ये आलं नाही: शत्रुघ्न सिन्हा
Follow us on

मुंबई : ‘मी अनेक कृत्ये केली, मात्र तरीही माझं नाव ‘मी टू’मध्ये आलं नाही’, असं वक्तव्य अभिनेते आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केलं. तसेच प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या विनाशामागेही एका महिलेचाच हात असतो, असेही ते म्हणाले. लेखक धृव सोमानी यांचे पुस्तक ‘अ टच ऑफ एविल’च्या उद्गाटनप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यासोबतच ‘मी टू आंदोलनाची चेष्टा करत नसून माझ्या वक्तव्यांना सकारात्मकरित्या घ्या’, असेही ते म्हणाले.

“आज मीटूचं वातावरण आहे आणि हे बोलण्यासाठी कोणतीही लाज वाटायला नको की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या विनाशामागे एक महिला असते. मी या आंदोलनात बघितले की यशस्वी पुरुषाच्या समस्या आणि बदनामीमागे सर्वाधिक महिला आहेत”, असं त्यांनी सांगितलं.

“मी स्वत:ला अतिशय भाग्यवान समजतो की, अनेक कृत्ये करुनही माझं नाव मीटूमध्ये आलं नाही. म्हणूनच मी माझ्या बायकोचं ऐकतो, काही नसूनही असं दाखवतो की, मी एक सुखी विवाहित पुरुष आहे, माझे जीवन खूप चांगले चालले आहे”, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

पत्नी पूनम ही एक ‘देवी’ आहे, माझं सर्वस्वी ती आहे, असं म्हणत जर कुणाला माझ्याबाबत काहीही बोलायचे किंवा सांगायचे असेल, तर कृपया सांगू नये, अशी विनंतीही त्यांनी केली.

काही दिवसांपूर्वी  ‘मी टू’ आंदोलनाचं वादळ उठलं होतं. अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकरांवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी मी टू मोहिमेअंतर्गत आपल्या व्यथा मांडल्या होत्या. यामध्ये अनेक बड्या लोकांवर लैंगिक छळ आणि बलात्काराचे आरोप करण्यात आले होते.