ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी हत्येप्रकरणी श्रीराम सेनेचा कार्यकर्ता ताब्यात

| Updated on: Jun 02, 2019 | 3:00 PM

बेळगाव : ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) श्रीराम सेनेच्या एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे. प्रवीण चतुर असे या 27 वर्षीय तरुणाचे नाव आहे. आरोपी तरुण शहापूर येथील रहिवासी आहे. विशेष तपास अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. आरोपी प्रवीण चतुरचा कलबुर्गींच्या हत्येत सहभाग असून त्याची मुख्य भूमिका होती, असेही […]

ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी हत्येप्रकरणी श्रीराम सेनेचा कार्यकर्ता ताब्यात
Suspect Pravin Chatur Shriram Sena
Follow us on

बेळगाव : ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) श्रीराम सेनेच्या एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे. प्रवीण चतुर असे या 27 वर्षीय तरुणाचे नाव आहे.

आरोपी तरुण शहापूर येथील रहिवासी आहे. विशेष तपास अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. आरोपी प्रवीण चतुरचा कलबुर्गींच्या हत्येत सहभाग असून त्याची मुख्य भूमिका होती, असेही सांगितले जात आहे.

शुक्रवारी सकाळी चतुरला ताब्यात घेऊन धारवाड जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी तपास पथकाने त्याच्या चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत आरोपी चतुरला कोठडी सुनावली.