हैदराबाद एन्काऊंटरची SIT चौकशी, 8 जणांच्या टीमचं नेतृत्व मराठी आयपीएस अधिकाऱ्याकडे

| Updated on: Dec 09, 2019 | 9:09 AM

डॉक्टर तरुणीच्या अत्याचारातील आरोपींच्या हैदराबाद येथील एन्काऊंटर (Hyderabad Encounter) प्रकरणाची तेलंगाना सरकारने 8 सदस्यांच्या विशेष तपास पथकाची (SIT Team) नेमणूक केली आहे (Marathi IPS officer Mahesh Bhagwat).

हैदराबाद एन्काऊंटरची SIT चौकशी, 8 जणांच्या टीमचं नेतृत्व मराठी आयपीएस अधिकाऱ्याकडे
Follow us on

हैदराबाद : डॉक्टर तरुणीच्या अत्याचारातील आरोपींच्या हैदराबाद येथील एन्काऊंटर (Hyderabad Encounter) प्रकरणाची तेलंगाना सरकारने 8 सदस्यांच्या विशेष तपास पथकाची (SIT Team) नेमणूक केली आहे (Marathi IPS officer Mahesh Bhagwat). हैदराबाद एन्काऊंटरविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. मानव हक्क आयोगाने देखील या प्रकरणी चौकशी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने देखील अखेर एसआयटीची नेमणूक करत एन्काऊंटरच्या चौकशीचे आदेश दिले. विशेष म्हणजे या टीमचं नेतृत्व महेश भागवत या एका मराठी आयपीएस अधिकाऱ्याकडे असणार आहेत (Marathi IPS officer Mahesh Bhagwat). भागवत रच्चाकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून सध्या काम करत आहेत. या टीमकडे एन्काऊंटरचा तपास करुन सविस्तर अहवाल सादर करण्याचं महत्त्वाचं काम असणार आहे.

तेलंगाना उच्च न्यायालयात आरोपींच्या एन्काऊंटर प्रकरणी आज (9 डिसेंबर) सुनावणी होणार आहे. तेलंगाना उच्च न्यायालयाने याआधीच हैदराबाद एन्काऊंटरमधील आरोपींचे मृतदेह 9 डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सुनावणी होऊपर्यंत मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. ही वेळ आज रात्री 8 वाजता संपेल. त्यामुळे आजच्या सुनावणीत न्यायालय पुढील काय दिशानिर्देश देते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) 7 सदस्यीय पथकाने बलात्कार झालेले ठिकाण आणि एन्काऊंटर झालेल्या स्थळाचीही शनिवारी (7 डिसेंबर) पाहणी केली. दरम्यान, तेलंगाना पोलिसांनी चारही आरोपींविरोधात चौकशी करताना पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मृत आरोपींपैकी एका आरोपीच्या पत्नीने शनिवारी नारायणपेट जिल्ह्यातील आपल्या गावी रस्त्यावर येत आंदोलनही केलं. आपल्यासोबत अन्याय झाल्याचं म्हणत तिने न्यायाची मागणी केली. विशेष म्हणजे त्याच दिवशी मानवाधिकार आयोगाचं पथक तेथूनच 50 किलोमीटरच्या अंतरावर चट्टनपल्ली गावात एन्काऊंटरची चौकशी करत होतं. पीडितेवर अत्याचार झालेलं ठिकाण येथून अगदी जवळच आहे.