सोलापूरच्या गड्डा यात्रेत भाविकांचे मनोरंजन करणारा अवलिया

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

सोलापूर : सिद्धरामेश्वरांची यात्रा म्हणजेच गड्डा यात्रेला सोलापुरात उद्यापासून सुरुवात होत आहे. समतेचे, एकतेचे प्रतिक म्हणून सातासमुद्रापलीकडे या यात्रेची महती पसरलेली आहे. त्यामुळे दरवर्षी या यात्रेत भविकांची संख्या वाढतच चालली आहे. दरवर्षी पाच लाखांपेक्षा जास्त भाविक या यात्रेत सहभागी होतात. येथे होणाऱ्या अक्षता सोहळ्यासाठी हे सर्व भाविक जमतात. सकाळपासूनच अक्षता सोहळ्यासाठी भाविक येथे गर्दी करतात. या यात्रेत […]

सोलापूरच्या गड्डा यात्रेत भाविकांचे मनोरंजन करणारा अवलिया
Follow us on

सोलापूर : सिद्धरामेश्वरांची यात्रा म्हणजेच गड्डा यात्रेला सोलापुरात उद्यापासून सुरुवात होत आहे. समतेचे, एकतेचे प्रतिक म्हणून सातासमुद्रापलीकडे या यात्रेची महती पसरलेली आहे. त्यामुळे दरवर्षी या यात्रेत भविकांची संख्या वाढतच चालली आहे. दरवर्षी पाच लाखांपेक्षा जास्त भाविक या यात्रेत सहभागी होतात. येथे होणाऱ्या अक्षता सोहळ्यासाठी हे सर्व भाविक जमतात. सकाळपासूनच अक्षता सोहळ्यासाठी भाविक येथे गर्दी करतात. या यात्रेत लोक लांबचा प्रवास करत सहभागी होतात. या भाविकांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम करतात बसवराज शास्त्री.

मंदिरात जमलेल्या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी सोहळ्यादरम्यान शांतता सुव्यवस्था जपण्यासाठी शास्त्री आपल्या अनोख्या व्याख्यान शैलीत भाविकांचे मनोरंजन करतात. गेल्या 49 वर्षांपासून बसवराज शास्त्री हे करत आहेत. सोहळ्यासाठी आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी, त्यांचा थकवा दुर करण्यासाठी शास्त्री प्रयत्नशील असतात. इतक्या मोठ्या जनसमुदायाला नियंत्रित करणे तसे अवघडंच, मात्र शास्त्री आपल्या भारदस्त आवाजात मराठी, हिंदी, तेलगू आणि मोडक्या-तोडक्या इंग्रजीत जेव्हा बोलायला सुरुवात करतात, तेव्हा सर्वांच्याचं नजरा त्यांच्यावर खिळून जातात.

यात्रेदरम्यान हिरेहब्बू यांच्या वाड्यातून मानाचे पाच नंदीध्वज सकाळी शहरातील प्रमुख रस्त्यावरून सिद्धेश्वर मंदिरातील समती कट्ट्याकडे अक्षता सोहळ्यासाठी प्रस्थान करतात. हे नंदीध्वज आणि मानकरी दुपारच्या सुमारास समती कट्ट्यावर पोहोचतात.

बसवराज हे मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू, इंग्रजी तसेच तरुणांच्या ओठावरील हिंग्लीश अगदी उत्तमरित्या बोलतात. वयाची साठी ओलांडलेले हे व्याख्यानकेसरी वेदमूर्ती बसवराज शास्त्री उपस्थितांना चिमटे काढत, विनोद करत या समतेच्या यात्रेकाळात माणुसकीचा विचार पेरत असतात. बसवराज शास्त्रींबाबत त्यांच्याच शब्दात बोलायचं झालं तर, ‘सिद्धेश्वर महाराज अँड हिज भक्त एकदम ग्रेट’.