“पवारांची ईव्हीएमवरील शंका म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे”

| Updated on: Jun 02, 2019 | 3:35 PM

वर्धा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएमवर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. तसेच पवारांना लक्ष्य करत त्यांच्या ईव्हीएमवरील शंका म्हणजे नाचता येईना अंगण वागडे, असला प्रकार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. ते वर्धा येथे खरीप हंगाम आढावा बैठकीला आले असताना पत्रकारांशी बोलत होते. “निवडणूक जिंकता येईना, ईव्हीएमवर दोष, धूल […]

“पवारांची ईव्हीएमवरील शंका म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे”
Follow us on

वर्धा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएमवर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. तसेच पवारांना लक्ष्य करत त्यांच्या ईव्हीएमवरील शंका म्हणजे नाचता येईना अंगण वागडे, असला प्रकार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. ते वर्धा येथे खरीप हंगाम आढावा बैठकीला आले असताना पत्रकारांशी बोलत होते.

“निवडणूक जिंकता येईना, ईव्हीएमवर दोष, धूल थी चेहरे पे और आईना साफ करते रहे” या म्हणींचा उपयोग करत मुनगंटीवारांनी पवारांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “47 वर्षे त्यांच्या हातात राज्याची सत्ता होती. पण अद्यापही त्यांना आम्ही राज्याचे सगळे प्रश्न सोडवले, असा दावा करता येत नाही.”

‘कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत एक भावना असावी म्हणून हिंदी’

तामिळनाडूमधील हिंदी भाषेच्या सक्तीच्या विषयावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, “आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन मोठ्या नेत्यांनी काही निर्णय घेतले आहेत. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत एक भावना असावी, राज्याराज्यात संघीयप्रणाली अवलंबवावी, त्यातून एकमेकांवरील स्नेह, प्रेम वाढावे यासाठी त्याकाळी एक विषय ठेवला होता. या विषयावर चर्चेतून संवादातून तोडगा काढत निर्णय व्हावा, असे मत व्यक्त केले आहे.”

‘खरे खोटे तपासून चौधरींवर कारवाई करणार’

मुंबई महापालिका अधिकारी निधी चौधरी यांनी गांधीजींबद्दल केलेल्या ट्वीटनंतर झालेल्या वादावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “चौधरींच्या मते त्यांचे ट्वीट तशा पध्दतीचे नसून त्या स्वतः महात्मा गांधीजींच्या विचारावर राज्यकारभार चालावा, असे म्हणाल्या. त्यामुळे त्यांच्या ट्वीटमधील खरे खोटे तपासून त्यांच्यावर योग्य कारवाई होईल.”