अवैध व्यवसायिकांशी लागेबांधे कोल्हापूर पोलिसांच्या अंगलट

| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

कोल्हापूर : जिल्ह्यात पोलिसांचे अवैध व्यवसायिकांशी असलेले लागेबांधे पोलिसांच्याच अंगलट आल्याचे पाहायला मिळाले. कोल्हापूरच्या 3 पोलिसांवर अवैध व्यावसायिकांशी संबंध असल्याचे आरोप झाले. त्यांची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली. त्यानंतर त्या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. महादेव रेपे, नारायण गावडे आणि अमित सुळगावकर अशी निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. […]

अवैध व्यवसायिकांशी लागेबांधे कोल्हापूर पोलिसांच्या अंगलट
Follow us on

कोल्हापूर : जिल्ह्यात पोलिसांचे अवैध व्यवसायिकांशी असलेले लागेबांधे पोलिसांच्याच अंगलट आल्याचे पाहायला मिळाले. कोल्हापूरच्या 3 पोलिसांवर अवैध व्यावसायिकांशी संबंध असल्याचे आरोप झाले. त्यांची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली. त्यानंतर त्या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

महादेव रेपे, नारायण गावडे आणि अमित सुळगावकर अशी निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. निलंबित कर्मचाऱ्यांपैकी रेपे आणि गावडेंवर अवैध व्यावसायिकांशी संबंध असल्याचा आरोप आहे, तर सुळगावकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराची तक्रार देण्यास आलेल्या नवविवाहितेची तक्रार न घेता कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका आहे.

निलंबित पोलीस कर्मचारी गांधीनगर, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी आहेत. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. जिल्ह्यातील 31 पोलीस ठाण्यातील 50 हून अधिक पोलीस कर्मचारी अशाच कारवाईच्या रडारवर असल्याचेही सांगितले जात आहे.