गेम टास्कसाठी तरुणी घरातून बाहेर पडली, 18 दिवसात 10 शहरं फिरली

| Updated on: Jul 22, 2019 | 8:03 PM

डिजीटल गेमचा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेमचा टास्क पूर्ण करण्यासाठी दहावीत शिकणाऱ्या मुलीने घरातून पळाली आणि नंतर याच पैशातून तिने 18 दिवसात 10 शहरांची भ्रमंती केली.

गेम टास्कसाठी तरुणी घरातून बाहेर पडली, 18 दिवसात 10 शहरं फिरली
Follow us on

नवी दिल्ली : स्मार्टफोनवर गेम खेळण्याचे लहान मुलांना व्यसन जडलं आहे. पब्जी, पोकोमॉन गो, ब्लू व्हेल यासारख्या अनेक गेममुळे लोकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र या डिजीटल गेमचा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नुकतंच एका गेमचा टास्क पूर्ण करण्यासाठी दहावीत शिकणाऱ्या मुलीने घरातून पळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या मुलीने घरातून पैसे चोरले आणि नंतर याच पैशातून तिने 18 दिवसात 10 शहरांची भ्रमंती केली. मात्र या भ्रमंतीदरम्यान दिल्ली पोलिसांना त्या मुलीला पकडण्यात यश आले आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनी या मुलीला सुखरुप तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द केले आहे. उत्तराखंडमधील पंतनगर परिसरात हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.

नेमकं प्रकरण काय? 

मे महिन्याची सुट्टीचा वेळ घालवण्यासाठी दहावीत शिकणाऱ्या या मुलीने आईच्या मोबाईलवर टॅक्सी ड्रायव्हर 2 हा गेम डाऊनलोड केला. ती दिवस-रात्र हा गेम खेळायची. यामुळे तिला या गेमचे व्यसन जडले होते. मात्र यानंतर अचानक 1 जुलैला उत्तराखंडमधील पंतनगर या तिच्या घरातून गायब झाली. यानंतर तिच्या घरातल्यांनी तिची शोधाशोध सुरु केली. तिने घरातील 12 हजाराची रोकडही चोरल्याचे घरातल्यांच्या लक्षात आले. यानंतर तिच्या आईवडिलांनी मुलगी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली.

यानंतर पोलीस अनेक ठिकाणी शोध घेत असताना गुरुवारी 18 जुलैला ती कमला मार्केटमध्ये सापडली. यावेळी ती रिक्षा चालकासोबत भांडण करत होती.

‘त्या’ गेममध्ये नेमकं काय?

यानंतर पोलीस अधिकारी विपुल जोशी यांनी या मुलीची चौकशी केली असता त्यांच्या समोर एक धक्कादायक बाब समोर आली. त्या मुलीने डाऊनलोड केलेल्या टॅक्सी ड्रायव्हर 2 या गेममध्ये एक ट्रॅक्सी ड्रायव्हर असतो. तो प्रवाशांना ट्रॅक्सी बसवतो. त्यानंतर तो ट्रॅक्सी ड्रायव्हर प्रचंड त्रास सहन करत, त्या प्रवाशाला त्या ठिकाणी सोडतो. या गेममध्ये ही मुलगी त्या ट्रॅक्सी ड्रायव्हरची भूमिका निभावत होती. या खेळादरम्यान तिला विविध शहरात फिरण्याची इच्छा झाली. त्यासाठी तिने पैसे चोरले आणि घरातून पळ काढला.

18 दिवस 10 शहरं

घरातून पळाल्यानंतर ती सर्वात आधी उत्तरप्रदेशातील बरेली शहरात पोहोचली. त्या ठिकाणाहून तिने लखनौला जाण्यासाठी बस पकडली. यानंतर तिने पुन्हा लखनऊ ते जयपूर प्रवास केला. जयपूरहून तिने उदयपूर, जोधपूर, अहमदाबाद यानंतर पुणे अशा चार विविध शहरांची भ्रमंती केली. यासर्व भ्रमंतीदरम्यान ती तीन वेळा दिल्लीत आली. पहिल्यांदा दिल्लीतून ती ऋषिकेश या ठिकाणी गेली. दुसऱ्यांनी ऋषिकेश आणि हरिद्वार या ठिकाणी जात पुन्हा दिल्लीला परतली. अशाप्रकारे घरातून पळाल्यानंतर तब्बल 18 दिवस तिने 10 शहरांची भ्रमंती केली.

दरम्यान ती जयपूरमध्ये असताना पोलिसांनी तिचे लोकेशन ट्रेस केले होते. मात्र तिला पकडण्यापूर्वी तिने त्या ठिकाणाहून पळ काढला.

रात्री स्लीपर बसचा प्रवास

या 18 दिवसात 10 शहरांच्या भ्रमंतीदरम्यान तिच्याकडे कोणतेही आयडी प्रुफ नसल्याने ती मुलगी कोणत्याही हॉटेलमध्ये थांबली नाही. याऐवजी तिने रात्रीच्या वेळी स्लीपर बसमध्ये प्रवास केला. विशेष म्हणजे या 18 दिवसात तिने अंघोळ केली नाही. तसेच तिने फक्त बिस्कीट आणि वेफर्स खात दिवस काढले.

अशाचप्रकारे तिचीही भ्रमंती सुरु असताना दिल्लीतील कमला मार्केट परिसरात ती एका रिक्षा ड्रायव्हरशी भांडण करत होती. त्यावेळी दिल्ली पोलिसांना तिला पकडण्यात यश आले. ती घरी परतल्यानंतर “आम्ही खूप नशीबवान आहोत की आमची मुलगी सुखरुप घरी परत आली” अशी प्रतिक्रिया तिच्या घराच्यांनी दिली.