विद्यार्थी मधल्या सुट्टीत डब्बा खायला गेले, शिक्षिकेची वर्गातच आत्महत्या

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

लखनऊ(बांदा) : विद्यार्थी मधल्यासुट्टीत डब्बा खाण्यासाठी गेले असताना एका शिक्षिकेने वर्गातच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात ही घटना घडली. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आत्महत्येमागचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदा जिल्ह्यात छिबावमधील प्राथमिक शाळेत शबनम (33) नावाची शिक्षिका काम करत होती. दुपारी शाळेतील […]

विद्यार्थी मधल्या सुट्टीत डब्बा खायला गेले, शिक्षिकेची वर्गातच आत्महत्या
Follow us on

लखनऊ(बांदा) : विद्यार्थी मधल्यासुट्टीत डब्बा खाण्यासाठी गेले असताना एका शिक्षिकेने वर्गातच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात ही घटना घडली. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आत्महत्येमागचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदा जिल्ह्यात छिबावमधील प्राथमिक शाळेत शबनम (33) नावाची शिक्षिका काम करत होती. दुपारी शाळेतील मधल्या सुट्टीदरम्यान विद्यार्थी बाहेर गेले असता शबनमने वर्गाचा दरवाजा बंद करून गळफास घेऊन आत्महत्या केली. मधली सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थी वर्गात आले. पण दरवाजा बंद असल्याने विद्यार्थ्यांनी दरवाजा ठोकण्यास सुरुवात केली. बराच वेळ शिक्षिका दरवाजा खोलत नसल्याने त्यांनी शेजारच्या वर्गातील शिक्षकांना याबाबत सांगितलं. त्यानंतर त्यांनीही बराच वेळ दरवाजा ठोठवला. पण तिने दरवाजा न उघडल्याने त्या शिक्षकांने दरवाजा तोडला.

दरवाजा तोडल्यानंतर शिक्षकानी वर्गात प्रवेश केला असता, त्यांना शबनम गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु रस्त्यातच तिने प्राण सोडले.

शबनमचा तीन वर्षापूर्वी अनिकेत कुशवाह (24) या मुलाशी आंतरजातीय प्रेम विवाह झाला होता. पण काही कारणात्सव त्या दोघांचा दोन महिन्यापूर्वी घटस्फोट झाला. सध्या या संपूर्ण प्रकरणाची बांदा जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात चौकशी सुरू आहे.