ठाण्याचीच ‘हवा’! तलावांच्या शहरातील हवा राज्यात सर्वोत्तम

| Updated on: Nov 07, 2019 | 9:23 AM

ठाणेकर सध्या महाराष्ट्रातील सर्वात शुद्ध हवा अनुभवत असल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून समोर आलं आहे.

ठाण्याचीच हवा! तलावांच्या शहरातील हवा राज्यात सर्वोत्तम
Follow us on

ठाणे : ‘हवा’ करणे हा शब्दप्रयोग सर्वत्र आपलीच चर्चा घडवून आणणे या अर्थाने तरुणाई हल्ली सर्रासपणे वापरताना दिसते. त्याच धर्तीवर हवेच्या बाबती ठाणेकरांची राज्यात ‘हवा’ आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण ठाणेकर सध्या महाराष्ट्रातील सर्वात शुद्ध हवा (Thane air quality index) अनुभवत आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

एकीकडे, दिल्लीमध्ये प्रदूषणाने अतिगंभीर पातळीही ओलांडलेली असताना ठाणेकर मात्र मोकळा श्वास घेऊ शकत आहेत. ‘तलावांचं शहर’ अशी ख्याती असलेल्या ठाण्यातील हवा ही महाराष्ट्रातील सर्वोत्तम, तर देशातील पाचव्या क्रमाकांची सर्वात शुद्ध हवा आहे. ठाण्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक (air quality index) 43 इतका आहे. गेल्या महिन्याभरातील ही आकडेवारी आहे.

ठाण्यानंतर नाशिक, अमरावती यांचा क्रमांक लागतो, तर पुण्याची हवा शुद्धतेच्या बाबतीच चौथ्या क्रमांकावर आहे. ठाण्याची आजूबाजूच्या शहरांची स्थिती मात्र तितकी उत्तम नाही. मुंबईत air quality index 82 आहे, तर नवी मुंबईत 93. दिवाळीच्या आठवड्यात फटाक्यांमुळे ही पातळी खालावल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

विशेष म्हणजे भिवंडी शहराने धोक्याची पातळी गाठली आहे. इथला हवा गुणवत्ता निर्देशांक 229 वर घसरला आहे. वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे प्रदूषण वाढल्याची भीती आहे.

50 पेक्षा कमी – उत्तम
50 ते 100 – समाधानकारक
100 ते 200 – अनारोग्यदायी
200 ते 300 – धोकादायक
300 ते 400 – अतिधोकादायक
400 पेक्षा अधिक – भीषण

गेल्या 30 दिवसांची आकडेवारी

महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरं

ठाणे – 43 (उत्तम)
नाशिक – 47 (उत्तम)
अमरावती – 47 (उत्तम)
पुणे – 61 (समाधानकारक)
औरंगाबाद – 65 (समाधानकारक)
चंद्रपूर – 75 (समाधानकारक)
नागपूर – 76 (समाधानकारक)
मुंबई – 82 (समाधानकारक)
सोलापूर – 88 (समाधानकारक)
नवी मुंबई – 93 (समाधानकारक)
कल्याण – 99 (समाधानकारक)
भिवंडी – 229 (धोकादायक)

अवकाळी पावसामुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया रुग्णांमध्ये वाढ

देशातील इतर महत्त्वाची शहरं

दुर्गापूर – 21 (सर्वात शुद्ध)
एलूर – 24
कोईम्बतूर – 33
शिलाँग – 33
बंगळुरु – 64
हैदराबाद – 76
चेन्नई – 78
कोलकाता – 120
दिल्ली – 271

Thane air quality index