पुण्यात हेल्मेटसक्ती, नियम मोडणाऱ्यांकडून एका दिवसात तीन लाख वसूल

| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

पुणे : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुण्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली. या हेल्मेटसक्तीला पुणेकरांनी विरोध केला, मात्र पोलिसांनी या नियमाचे पालन न करणाऱ्या पुणेकरांवर कडक कारवाई केली. या कारवाईतून पहिल्याच दिवशी पोलिसांनी लाखो रुपयांचा दंड वसूल केला. हेल्मेटसक्तीच्या पहिल्या दिवशी पोलिसांनी तीन लाखाहून जास्त रुपयांचा दंड पुणेकरांकडून वसूल केला आहे. पुणेकरांचा हेल्मेटसक्तीला असलेला विरोध झुगारुन पोलिसांनी […]

पुण्यात हेल्मेटसक्ती, नियम मोडणाऱ्यांकडून एका दिवसात तीन लाख वसूल
Follow us on

पुणे : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुण्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली. या हेल्मेटसक्तीला पुणेकरांनी विरोध केला, मात्र पोलिसांनी या नियमाचे पालन न करणाऱ्या पुणेकरांवर कडक कारवाई केली. या कारवाईतून पहिल्याच दिवशी पोलिसांनी लाखो रुपयांचा दंड वसूल केला. हेल्मेटसक्तीच्या पहिल्या दिवशी पोलिसांनी तीन लाखाहून जास्त रुपयांचा दंड पुणेकरांकडून वसूल केला आहे.

पुणेकरांचा हेल्मेटसक्तीला असलेला विरोध झुगारुन पोलिसांनी काल पुण्यात कारवाई केली. या दरम्यान पोलिसांनी 7 हजार 490 जणांवर हेल्मेट न वापरल्याने कारवाई केली, ज्यांच्याकडून तब्बल तीन लाखाहून अधिकची रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली, तर 2 जानेवारीला म्हणजे आज दुपारी 3 वाजेपर्यंत तब्बल चार हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली, ज्यांच्याकडूनही लाखो रुपये दंड स्वरुपात पोलिसांनी वसूल केले.

पुणे पोलिसांच्या धडक कारवाईनंतर हेल्मेट बंदीच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील रस्त्यावरच्या हेल्मेट धारकांच्या संख्येत वाढ झालेली दिसून आली. मंगळवारी जिथे दहा जणांमागे निम्मे जण विना हेल्मेट घालून दिसत होते, तिथे आज मात्र हे चित्र बदलेले दिसलं.

पुढे ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. त्यामुळे पुणे पोलिसांच्या कारवाईचा धसका घेत पुणेकरांनी हेल्मेट खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी केल्याचं चित्र आहे.

पुण्यातील विविध संघटना, संस्था आणि राजकीय पक्षांनी या हेल्मेट सक्तीला तीव्र विरोध दर्शवला. पण, काही जणांचा हा विरोध पुणेकरांच्या खिशाला खिंडार पाडत असल्याचं दिसत आहे.