मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन वृद्ध महिलांना वाहनाने चिरडलं

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

पुणे : मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन महिलांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील उदापूर गावाजवळ नगर-कल्याण महामार्गावर सकाळी साडे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. मॉर्निंग वॉक करत असताना एका अज्ञात वाहनाने या महिलांना धडक दिली. यामध्ये तीनही महिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक वाहनासह फरार झाला आहे. सकाळी साडे पाच ते सहाच्या […]

मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन वृद्ध महिलांना वाहनाने चिरडलं
Follow us on

पुणे : मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन महिलांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील उदापूर गावाजवळ नगर-कल्याण महामार्गावर सकाळी साडे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. मॉर्निंग वॉक करत असताना एका अज्ञात वाहनाने या महिलांना धडक दिली. यामध्ये तीनही महिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक वाहनासह फरार झाला आहे.

सकाळी साडे पाच ते सहाच्या सुमारास या तीन महिला रोजप्रमाणे फिरायला गेल्या होत्या. चालत असताना अचानक एका अज्ञात वाहनाने या महिलांना धडक दिली. त्यानंतर वाहनचालकाने वाहनासह तेथून पळ काढला. अपघात झाल्यानंतर गावातील काही लोकांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही महिलांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ही धडक इतकी जबर होती की, या तिनही महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मीराबाई सुदाम ढमाले (वय 60), कमल महादेव ढमाले (वय 62), चांगुणा रामभाऊ रायकर (वय 70) या महिलांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकाच घरातील दोन महिलांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तर ओतूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नगर-कल्याण महामार्गावर आळेफाटा ते माळशेज घाटापर्यंत लोकवस्ती असलेली गावं आहेत. त्यामुळे नागरिक, वृद्ध याच महामार्गावर सकाळी फिरायसाठी जातात. गेल्या अनेक दिवसांपासून इथे लोक फिरायला जातात. मात्र, महामार्गावर मॉर्निंग वॉकला जाणं कुणाच्या जीवावर बेतू शकतं, याचा या लोकांनी कधी विचारही केला नसेल.

पाहा व्हिडीओ :