कोकणात गुलाबी थंडीची चाहूल, निसर्ग सौंदर्याचा नजराणा बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी

| Updated on: Dec 21, 2019 | 11:37 PM

कोकणाच्या सौंदर्यात भर पडणाऱ्या या गुलाबी थंडीची निवळी घाटातली सफर प्रत्येकाला बघण्याची इच्छा होते. हा थंडी आणि सौदर्याचा अनोखा नजराणा डोळ्यात साठवायला बाहेर (konkan in winter) पडतात.

कोकणात गुलाबी थंडीची चाहूल, निसर्ग सौंदर्याचा नजराणा बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी
Follow us on

रत्नागिरी : निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेला प्रदेश म्हणजे कोकण… कोकणातील सौंदर्य थंडीतच अधिक (konkan in winter) खुलतं. सध्या कोकणात हुडहुडी भरणाऱ्या थंडीची चाहूल दिली आहे. उशिरा का होईना पण कोकणात दाट धुकं पडायला लागलं आहे. पण यासाठी डिसेंबरची वाट पहावी लागली आहे. पण याच थंडीची चाहुलीने सध्या कोकणातला निसर्ग खुलला आहे.कोकणातल्या घाट रस्त्यात धुकं पहायला मिळतं आहे. त्यामुळेच कोकणात सध्या वळणावळाच्या घाटातले रस्ते दाट धुक्याची चादर ओढली आहे.

अगदी सकाळी दहा वाजेपर्यंत कोकणातल्या निवळी घाटातलं धुकं हलता हलत नाही. कोकणाच्या सौंदर्यात भर पडणाऱ्या या गुलाबी थंडीची निवळी घाटातली सफर प्रत्येकाला बघण्याची इच्छा होते. हा थंडी आणि सौदर्याचा अनोखा नजराणा डोळ्यात साठवायला बाहेर (konkan in winter) पडतात.

थोडा उशिरा का होईना पण कोकणात अनेक ठिकाणचा पार खाली यायला सुरुवात झाली आहे. कोकणात सुद्धा सध्या बोचऱ्या थंडीनं दस्तक दिली आहे. गेल्या चार सहा दिवसापासून पडणाऱ्या थंडीनं अनेकांना गार केलं आहे. पण या थंडीनं कोकणात येणाऱ्या घाटातल्या रत्याचं सौदर्य खुलून गेला आहे. रत्नागिरीजवळचा निवळी घाट हा दाट धुक्याच्या चादर ओढल्याप्रमाणे सध्या या ठिकाणी धुकं पाहायला मिळत आहे.

वळणावणाच्या या घाटात दाट धुक्यातून समोरुन गाडी येताना आणि त्यातून वाट काढत जाण्याचा काही आनंद वेगळाच. त्यामुळे निसर्गाचं हे सौंदर्य न्याहाळायला अनेक बाईक रायडर्स या ठिकाणी येतात. अनेक जण तर बुलेट घेऊन या निसर्गाच्या सहवासात रमतात.

 

निवळी जवळच्या घाटात सध्या दहा वाजेपर्यत धुक्याची चादर ओढली गेलेली असते. जवळच असलेल्या बावनदीतल्या पाण्यामुळे इथल्या घाटातल्या धुक्यानं इथं येण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे इथला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक निसर्गमित्र या घाटातलं सौंदर्य पहाण्यासाठी बाईकने इथं येतात. दाट धुक्यातून मार्ग काढत जाणारी कोकणातली लाल परी सुद्धा या घाटात पहायला मिळते. कोकणात येताना अनेकांना हे सौदर्य स्वर्गाप्रमाणे वाटते. त्यामुळे या सौदर्याचं अनेक पर्यटक दिवानेच (konkan in winter) होतात.

चार सहा दिवसांपासून कोकणात थंडी आणि धुकं पहायला मिळतं आहे. त्यामुळेच सध्या कोकणातला निसर्गाचं रुपडे पालटलं आहे. या पालटलेल्या निसर्ग डोळ्यात साठवण्यासाठी अनेकांचे पाय कोकणाकडे वळलेत.

कोकणात सध्या वळणावळणाचे घाट रस्ते आणि त्याचं सौदर्य थंडीच्या चाहुलीने अधिक खुलले आहेत. घाट माथ्यावरच्या डोंगरावरुन धुक्यातून अंधुक दिसणारे डोंगर इथली लपाछपीचा डाव खेळणारी हिरवाई आणि दाट धुक्यात सुद्धा वळळावणात हरवेला रस्ता हे सौदर्य इथं येऊन प्रत्येकाने पहाण्याचा आनंद काही वेगळाच असतो.