नववर्षात रेल्वे प्रवाशांना फटका, तिकीट दरवाढीची शक्यता

| Updated on: Dec 27, 2019 | 8:39 AM

भारतीय रेल्वेच्या सर्व तिकीट दरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता (Indian Railway Fare hike) आहे. येत्या आठवडाभरात नव्या दरवाढीबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नववर्षात रेल्वे प्रवाशांना फटका, तिकीट दरवाढीची शक्यता
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या सर्व तिकीट दरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता (Indian Railway Fare hike) आहे. येत्या आठवडाभरात नव्या दरवाढीबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या तिकीटांची दरवाढ प्रति किलोमीटर 5 पैसे ते 40 पैशांपर्यंत वाढवलं जाण्याची शक्यता आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिलं (Indian Railway Fare hike) आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रेल्वेच्या एसी कोचपासून जनरल कोचपर्यंत सर्व कोचच्या तिकीटांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. यात मासिक आणि त्रैमासिक पासाचाही समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रेल्वेच्या भाडेवाढीसाठी गेल्या महिन्यातच पंतप्रधान कार्यालयातून मंजूरी देण्यात आली होती. मात्र झारखंड विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ रोखण्यात आली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

रेल्वेच्या बोर्डने नवीन तिकीट दराचा तक्ता तयार केला आहे. या नवीन तिकीट दरानुसार रेल्वेला दरवर्षी 4 ते 5 कोटी रुपयांची अतिरिक्त उत्पन्न मिळणार (Indian Railway Fare hike) आहे.

गेल्या काही वर्षांपासून रेल्वेने प्रवाशी तिकीटांची दरवाढ केलेली नाही. तसेच रेल्वेला आर्थिक मंदीचाही फटका बसला आहे. यंदाच्या एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यामध्ये रेल्वेचे मालवाहतूक महसूल कमी झाला असून तो 19, 412 कोटी रुपये इतका झाला आहे.

तसेच विमान प्रवास स्वस्त झाला आहे. त्यामुळे रेल्वेच्या प्रवाशांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे रेल्वेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. या सर्व कारणांमुळे येत्या वर्षात रेल्वेच्या तिकीट दरात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात (Indian Railway Fare hike) आहे.