बेफिकीरी नडली, भाजप आमदाराचा शस्त्र परवाना निलंबित

| Updated on: Dec 01, 2019 | 10:32 AM

पिस्तुल चोरीला गेल्याबाबत आमदार तुषार राठोड यांना काहीही कल्पना नव्हती. पोलिसांना त्यांचं पिस्तुल एका चोरट्याकडे आढळल्याने हा धक्कादायक प्रकार उघड झाला.

बेफिकीरी नडली, भाजप आमदाराचा शस्त्र परवाना निलंबित
Follow us on

नांदेड : नांदेडमधील मुखेड मतदारसंघाचे भाजप आमदार तुषार राठोड (Tushar Rathod) यांचा शस्त्र परवाना निलंबित (BJP MLA Weapons license) करण्यात आला आहे. राठोड यांचं पिस्तुल एका चोरट्याकडे आढळल्यामुळे खळबळ उडाली. मात्र पिस्तुल चोरीला गेल्याची माहितीच राठोड यांना नसल्याने त्यांच्यावर बेफिकीरीचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना निलंबित करण्याची कारवाई केली.

तुषार राठोड हे नांदेडमधील मुखेड मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आले आहेत. त्यांचं पिस्तुल चोरीला गेलं होतं, मात्र राठोड यांना चोरीबाबत काहीही कल्पना नव्हती. पोलिसांना त्यांचं पिस्तुल एका चोरट्याकडे आढळल्याने हा धक्कादायक प्रकार उघड झाला.

तुषार राठोड यांना पिस्तुलाच्या चोरीविषयी काहीच माहिती नसल्याचं समोर आलं. पिस्तुल सांभाळताना निष्काळजी आणि बेफिकिरी दाखवल्यामुळे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार तुषार राठोड यांचा शस्त्र परवाना निलंबित केला.

मातोश्री-2 बांधून तयार, ठाकरे कुटुंबाच्या 8 मजली घराची खास वैशिष्ट्ये

2015 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत तुषार राठोड हे 47 हजार 248 मतांनी विजयी झाले होते. तुषार राठोड यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत भाजपचा गड कायम राखला होता. 2019 मध्ये भाजपने पुन्हा राठोड यांना उमेदवारी दिली. त्यांनी काँग्रेसच्या भाऊसाहेब पाटील यांचा 31 हजार 863 मतांनी दणदणीत पराभव केला.

दरम्यान, या चोरट्याने आमदाराच्या या पिस्तुलाचा धाक दाखवून काय काय गुन्हे (BJP MLA Weapons license) केले आहेत, याचा पोलिस तपास करत आहेत.