TV9 Impact: नगरमध्ये बलात्कार पीडितेच्या मुलीला जाळणाऱ्याला अटक, टीव्ही9 च्या बातमीनंतर पोलीस तपासाला वेग

| Updated on: Aug 16, 2020 | 6:06 PM

अहमदनगरमध्ये बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने पीडितेच्या 10 वर्षीय मुलीला पेटवणाऱ्या आरोपीला अटक झाली (Neelam Gorhe on Ahmednagar rape case).

TV9 Impact: नगरमध्ये बलात्कार पीडितेच्या मुलीला जाळणाऱ्याला अटक, टीव्ही9 च्या बातमीनंतर पोलीस तपासाला वेग
Follow us on

अहमदनगर : बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने पीडितेच्या 10 वर्षीय मुलीलाच पेटवल्याच्या प्रकरणात एका आरोपीला अटक झाली आहे (Neelam Gorhe on Ahmednagar rape case). टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर पोलीस तपासाला वेग आला. शनिवारी (15 ऑगस्ट) मध्यरात्री उशिरा या मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. विशेष म्हणजे टीव्ही 9 च्या या बातमीची दखल घेत आमदार नीलम गोऱ्हे यांनी देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

अहमदनगर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी राजाराम तरटे याला अटक केले आहे, तर दुसरा आरोपी अमोल तरटे अद्याप फरार आहे. या प्रकरणात आमदार नीलम गोऱ्हे यांनी विशेष लक्ष घालत थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिलं आहे. आरोपींना जामीन किंवा पेरॉलवर सोडताना न्यायालयाकडून घालून देण्यात आलेल्या निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी आणि कठोर कारवाई पोलिसांकडून होणे गरजेचे असल्याचं मत यावेळी नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं.

नीलम गोऱ्हे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे, “अहमदनगर जिल्ह्यात वारंवार महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. सुपा येथील प्रकार धक्कादायक आहे. मार्च 2020 मधील बलात्काराची केस मागे घेण्यासाठी महिलेला धमकावण्यात आले. तसेच पीडित महिलेला जाळण्याचा प्रयत्न केला. बलात्काराची केस मागे घे असं म्हणत 10 वर्षाच्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न झाला. यात ती मुलगी 15 टक्के भाजली आहे.”


“बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या आणि इतर घटनांमध्ये अटकेत असलेल्या आरोपींना कोव्हिड-19 मुळे जामीन मिळत आहे. जामीन मिळाला असला तरी देखील त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत. परंतु याची अंमलबजावणी होताना दिसत नाही”, असं म्हणत नीलम गोऱ्हे यांनी काही मागण्या केल्या आहेत.

नीलम गोऱ्हेंच्या मुख्य मागण्या

  • पीडित महिलेला आणि तिच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे
  • या घटनेतील आरोपींना कोव्हिड-19 मुळे जामीन देण्यात आला. यामुळे पीडितेच्या जीवास धोका निर्माण झाला असल्याने जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयाला विनंती करावी.
  • बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या घटनांमधील आरोपींना जामीन किंवा पेरॉलवर सोडताना न्यायालयाच्या निर्बंधांचे पालन व्हावे. तसेच नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

प्रकरण काय?

पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, “आम्ही आमच्या कोपीमध्ये जेवण करत होतो. त्यावेळी आरोपी मोटार सायकलवरुन आमच्या घरी आले. त्यावेळी त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी तू बलात्काराची केस मागे घे, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. यावेळी आमची मुलगी बाहेर आली असता आरोपीने त्याच्या हातातील पेट्रोल फेकले. त्यानंतर त्यांनी मुलीचे अंगावर काडी पेटवून फेकली. त्यामुळे मुलीच्या अंगावरील फ्रॉक जळून भाजून गंभीर जखमी झाली.”

संबंधित बातमी :

अहमदनगरमध्ये हैदोस, बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीने पीडितेच्या मुलीला पेटवलं

संबंधित व्हिडीओ :

Neelam Gorhe on Ahmednagar rape case