15 वर्षांपासून फरार असलेला डाॅन रवी पुजारीला आफ्रिकेत अटक

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

Underworld don Ravi pujari arrested : भारतातून गेल्या 15 वर्षांपासून फरार असलेला कुख्यात आरोपी रवी पुजारीला अखेर अटक करण्यात आली आहे. पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल या देशातून त्याला अटक करण्यात आली. बंगळुरु पोलिसांनी रवी पुजारीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर अनेक वर्षांपासून भारतीय तपास यंत्रणांची नजर होती. रवी पुजारीने […]

15 वर्षांपासून फरार असलेला डाॅन रवी पुजारीला आफ्रिकेत अटक
Follow us on

Underworld don Ravi pujari arrested : भारतातून गेल्या 15 वर्षांपासून फरार असलेला कुख्यात आरोपी रवी पुजारीला अखेर अटक करण्यात आली आहे. पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल या देशातून त्याला अटक करण्यात आली. बंगळुरु पोलिसांनी रवी पुजारीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर अनेक वर्षांपासून भारतीय तपास यंत्रणांची नजर होती. रवी पुजारीने अनेक अंडरवर्ल्ड डॉनसोबत काम केलेलं आहे, तो अनेक गुन्ह्यांत आरोपी आहे. त्याच्यावर खंडणी तसेच हत्येचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

नुकतंच भारतीय तपास यंत्रणांना संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथून ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील आरोपी राजीव सक्सेना आणि मनी लॉड्रिंगमधील आरोपी दीपक तलवारला देशात आणण्यात यश आले. या दोघांनाही बुधवारी भारतात आणण्यात आले.

त्याचप्रकारे आता भारताचा आणखी एक कुख्यात आरोपी डॉन रवी पुजारीला अटक करण्यात भारतीय तपास यंत्रणांना यश आले आहे. रवी पुजारीवर गेल्या अनेक दिवसांपासून तपास यंत्रणांची नजर होती. आफ्रिकेच्या सेनेगल देशात तो बुर्किना फासो येथे असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती, त्यानंतर तपास यंत्रणा त्याच्यावर नजर ठेवून होत्या.

काहीच दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी रवी पुजारीच्या दोन हस्तकांना विलिअम रॉड्रिक्स आणि आकाश शेट्टीला अटक केली होती. पोलिसांकडे खंडणीच्या तक्रारी आल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला.

गेल्या 15 वर्षांत रवी पुजारीविरोधात अनेक देशांमध्ये अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. याआधी तो ऑस्ट्रेलियात लपला असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती.