पाच दिवसांत ‘उरी’ची कमाई तब्बल…

| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

मुंबई : ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. दिवसेंदिवस या सिनेमाची लोकप्रियता वाढतच चालली आहे. त्यामुळे सिनेमागृहांवर लोक गर्दी करत आहेत. फक्त 25 कोटीमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्सऑफिसवर 50 कोटींचा गल्ला जमवला आहे आणि तेही अवघ्या पाच दिवसांत. त्यामुळे आपल्या पहिल्याच आठवड्यात हा सिनेमा 60 कोटीहून जास्त कमावेल असा अंदाज आता […]

पाच दिवसांत ‘उरी’ची कमाई तब्बल...
Follow us on

मुंबई : ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. दिवसेंदिवस या सिनेमाची लोकप्रियता वाढतच चालली आहे. त्यामुळे सिनेमागृहांवर लोक गर्दी करत आहेत. फक्त 25 कोटीमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्सऑफिसवर 50 कोटींचा गल्ला जमवला आहे आणि तेही अवघ्या पाच दिवसांत. त्यामुळे आपल्या पहिल्याच आठवड्यात हा सिनेमा 60 कोटीहून जास्त कमावेल असा अंदाज आता लावला जात आहे.पाच दिवसांत या सिनेमाने एकूण 54.24 कोटींचा गल्ला जमवला आहे.

उरी बेस कॅप्मवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यावर आधारीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडतो आहे. या सिनेमाचे सर्व शो हाऊसफुल आहेत. हा सिनेमा इतका यशस्वी ठरला तो या सिनेमाच्या कहाणी आणि कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे.


या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याचं दिवशी शुक्रवारी 8.20 कोटींचा व्यवसाय केला, शनिवारी 12.43 कोटींचा गल्ला जमवला, तर तिसऱ्या दिवशी रविवारी 15.10 कोटी कमावले, सोमवारी 10.51 कोटी कमावले तर मंगळवारी 8 कोटीची कमाई केली. आतापर्यंत या सिनेमाने एकूण 54.24 कोटींचा गल्ला जमवला. तर हा सिनेमा आपल्या पहिल्या वीकेंडमध्ये 35.13 कोटींचा व्यवसाय करण्यात यशस्वी ठरला होता.

‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा 2016 साली जम्मू-काश्मीरमधील उरी बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत आहे. यात अभिनेता विकी कौशल, अभिनेते परेश रावल, अभिनेत्री यामी गौतम हे मुख्य भूमिकेत आहेत.

या सिनेमातील अभिनेता विकी कौशल याच्या अभियनाला प्रेक्षरकांची पसंती मिळते आहे. तसेच यातील अभिनेते परेश रावल, अभिनेत्री यामी गौतम यांची भूमिकाही महत्वाची आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य धार यांनी केलं.

भारतीय सैन्याच्या उरी बेस कॅप्मवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 18 सप्टेंबर 2016 रोजी भ्याड हल्ला केला होता. यात भारताचे 19 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. याच सर्जिकल स्ट्रईकवर हा सिनेमा आहे.

आजवर भारतीय लष्करावर आधारीत अनेक सिनेमे आलेत, पण ‘उरी’ हा त्यासर्वांपेक्षा खूप वेगळा आहे. मनाला भिडणारं कथानक, योग्य कास्टिंग, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय, त्यासोबतच देशभक्ती, उत्कंठा आणि अंगावर शहारे आणणारे दृश्य यासर्वांची सांगड घातलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे.