सामूहिक विवाह सोहळ्यात नवरींना सजवण्यासाठी 20 शिक्षिका ड्युटीवर

| Updated on: Jan 27, 2020 | 11:28 PM

आतापर्यंत शिक्षकांना जनगणनेसोठी घरोघरी फिरताना पाहिलं असेल, मतदानासाठी काम करताना पाहिलं असेल. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये आता शिक्षकांना एक नवीनच काम देण्यात आलं आहे.

सामूहिक विवाह सोहळ्यात नवरींना सजवण्यासाठी 20 शिक्षिका ड्युटीवर
Follow us on

लखनऊ : आतापर्यंत शिक्षकांना जनगणनेसोठी घरोघरी फिरताना पाहिलं असेल, मतदानासाठी काम करताना पाहिलं असेल (Teachers On Marriage Duty). मात्र, उत्तर प्रदेशमध्ये आता शिक्षकांना एक नवीनच काम देण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगरमध्ये महिला शिक्षिकांना नवरीला सजवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सिद्धार्थनगरच्या एबीएसएने सामूहिक विवाहात नवरींना तयार करण्यासाठी 20 शिक्षिकांची ड्युटी लावली आहे (Teachers On Marriage Duty).

सामूहिक विवाह कार्यक्रम हा सिद्धार्थनगर जिल्हा मुख्यालयात जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी मैदानाच्या आवारात येत्या 28 जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात नवरींना तयार करण्यासाठी या शिक्षिकांची ड्युटी लावण्यात आली आहे.

साक्षी श्रीवास्तव, संध्या कबीर, नीलम वर्मा, वंदना यादव, शांती यादव, साधना श्रीवास्तव, नीलम, आरती चौधरी, जुही मिश्रा, प्रतिमा श्रीवास्तव, पल्लवी सिंह, उषा उपाध्याय, अनुराधा, सुष्मा जयस्वाल, नाजमीन, संगिता, प्रियदर्शिका पांडे, अनुराधा शुक्ला, संदीपा राजा आणि कालिन्दी शर्मा या शिक्षिकांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या सर्व शिक्षिकांना 28 जानेवारीला सकाळी 9 वाजता जिल्हा प्राथमिक शिक्षा अधिकारी मैदानावर पोहोचण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.