नरेंद्र मोदी नाव ठेवलेल्या बाळाचे पुन्हा नाव बदललं!

| Updated on: May 29, 2019 | 3:18 PM

लखनौ : गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही मोदी लाट पाहायला मिळाली. या लाटेमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला अभूतपूर्व यश मिळाले. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जन्मलेल्या एका बाळाचे नाव चक्क नरेंद्र मोदी ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र बाळाच्या आईने आपल्या मुलाचे नाव बदलून मोहम्मद अल्ताफ आलम मोदी असे केले आहे. मुस्लीम समाज आणि शेजाऱ्यांच्या भितीमुळे तिने […]

नरेंद्र मोदी नाव ठेवलेल्या बाळाचे पुन्हा नाव बदललं!
Follow us on

लखनौ : गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही मोदी लाट पाहायला मिळाली. या लाटेमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला अभूतपूर्व यश मिळाले. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जन्मलेल्या एका बाळाचे नाव चक्क नरेंद्र मोदी ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र बाळाच्या आईने आपल्या मुलाचे नाव बदलून मोहम्मद अल्ताफ आलम मोदी असे केले आहे. मुस्लीम समाज आणि शेजाऱ्यांच्या भितीमुळे तिने हे नाव बदल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या बाळाचा जन्म 12 मे रोजी झाला असल्याचा डॉक्टरांनी दावा केला आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने अभूतपूर्व यश मिळवले आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची जादू अद्याप जनतेमध्ये असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे दिवसेंदिवस नरेंद्र मोदींची चर्चा वाढत चालली आहे.

नेमकं प्रकरण काय ? 

मोदींची धोरण, मुलाखती, भाषण यामुळे प्रभावित झालेल्या उत्तरप्रदेशातील गोंडा येथील एका मुस्लीम कुटुंबाने आपल्या मुलाचे नाव नरेंद्र दामोदर दास मोदी असे ठेवले होतं. वजीरगंज येथील परसापूरमधील मोहम्मद इदरीश आणि मैनाज बेगम यांना 23 मे लोकसभा निवडणुकीदिवशी पुत्ररत्नाचा लाभ झाला. या मुलाचे नाव काय ठेवावे याबाबत चर्चा रंगली होती. या चर्चेदरम्यान मैनाज बेगम म्हणजेच त्याच्या आईने नाव नरेंद्र दामोदर दास मोदी अस ठेवायचं असा हट्ट धरला. यावर तिच्या कुटुंबाने विरोध दर्शवला. मात्र दुबईत नोकरी करणाऱ्या मैनाज बेगम यांच्या पती मोहम्मद इदरीश यांनी मात्र याबाबत होकार कळवला आणि त्या बाळाचे नाव नरेंद्र दामोदर दास मोदी असे ठेवण्यात आले.

बाळाचं नाव बदललं!

मात्र नुकतंच मैनाज बेगम यांनी आपल्या बाळाचे नाव बदललं आहे. समाजातील काही लोकांनी त्यांना हे नाव बदलण्यास जबरदस्ती केली आहे. मैनाज बेगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींच्या नावाप्रमाणे बाळाचे नाव ठेवल्याने शेजारील लोकांनी तसेच समाजातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच त्याचे नाव बदला अन्यथा तुमच्या बाळाला धोका उद्भवू शकतो अशी धमकीही काही लोकांनी तिला दिली. या धमकीला घाबरलेल्या मैनाज यांनी आपल्या बाळाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तिने आपल्या बाळाचं नाव बदलंत मोहम्मद अल्ताफ आलम मोदी असे ठेवले आहे. भविष्यात माझ्या मुलाला नावामुळे कोणताही त्रास सहन करावा लागू नये म्हणून मी हा निर्णय घेतल्याचही मैनाज यांनी स्पष्ट केलं आहे.

मुलाच्या जन्मदिवसावरून वाद

दरम्यान आता या मुलाच्या जन्मदिवसावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. या बाळाचा जन्म 12 मे रोजी दुपारी 12 च्या सुमारास झाला होता. मात्र महिलेने प्रसिद्धीझोतात येण्यासाठी मुलगा 23 मे रोजी जन्मल्याचं सांगितलं आणि त्यासाठी तिने आपल्या मुलाचे नाव नरेंद्र मोदी असे ठेवलं.