रोजंदारीवर काम करणाऱ्या या मजुराची ‘बॉडी’ पाहून व्हाल थक्क; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

| Updated on: Nov 02, 2020 | 5:27 PM

या फोटोमधील मजूर दिवसभर रस्त्यावर कष्टाची कामे करतो. | Gym

रोजंदारीवर काम करणाऱ्या या मजुराची बॉडी पाहून व्हाल थक्क; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
(छाया सौजन्य-सत्यप्रकाश पांडे)
Follow us on

नवी दिल्ली: आपल्यापैकी अनेकजण शरीर कमवण्यासाठी तासनतास जिममध्ये जाऊन घाम गाळतात. काहीजण यासाठी महागडी ट्रेनिंग आणि सप्लिमेंटसही घेतात. या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक फोटो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा फोटो रोजंदारीवर काम करणाऱ्या एका मजुराचा आहे. रोज तासनतास कष्टाचे काम करून या मजुराने अनेकांना लाजवेल, असे शरीर कमावले आहे.  (Viral Photo Of A Daily Wage Worker amazing body)

सत्यप्रकाश पांडे यांनी हे छायाचित्र टिपले आहे. हे छायाचित्र फेसबुकवर शेअर झाल्यानंतर लगेचच व्हायरल झाले. या फोटोमधील मजूर दिवसभर रस्त्यावर कष्टाची कामे करतो. अनेकजण जिममध्ये महिन्याला जितके पैसे मोजत असतील तेवढी या मजुराची महिन्याची कमाईही नसेल. तरीही या मजुराने कमावलेल्या शरीरयष्टीचे अनेकांकडून कौतुक होत आहे.

रोजंदारीच्या कामाचा भरवसा नसल्याने बहुताशं मजूर हे अत्यंत काटकसरीने खर्च करतात. त्यामुळे बहुतेकदा त्यांच्या जेवणात चपाती, कांदा, मीठ, लसूण किंवा तेलात परतलेली कांद्याची भाजी अशा पदार्थांचा समावेश असतो. याउलट जिममध्ये जाणाऱ्या अनेकांना सप्लिमेंटस्, स्पेशल डाएट घेऊनही अशाप्रकारची बॉडी कमवायला जमत नाही. त्यामुळे या मजुराने कमावलेली शरीरयष्टी अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

संबंधित बातम्या:

Insta Fitness Dose: ‘फिटनेस मोड ऑन’, सोफी चौधरी 7 महिन्यांनंतर जिममध्ये

सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत ‘कसरती’ सुरु; अखेर जिम उघडल्या!

अभिनेता ईशान खट्टरचं गजब बॉडी ट्रान्सफॉर्मेशन, चाहत्यांना धक्का

(Viral Photo Of A Daily Wage Worker amazing body)